IND vs NZ : श्रेयस अय्यरने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड, जगातल्या कुठल्याही कॅप्टनला ही कमाल जमलेली नाही, धोनीलाही टाकलं मागे
IND vs NZ : श्रेयस अय्यर खूप नशिबवान कॅप्टन आहे. क्रिकेटच्या खेळात नशिबाची साथ सुद्धा तुम्हाला लागते. सध्या न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या टी20 सीरीजमध्ये श्रेयसचं नशीब जोरात आहे.

क्रिकेटमध्ये फक्त टॅलेंटच नाही तर नशिबाची साथ देखील तितकीच गरजेची असते. सध्या टीम इंडियाच्या टी20 टीमचा कॅप्टन श्रेयस अय्यरला नशिबाची चांगली साथ मिळतेय. श्रेयस अय्यरचे निर्णय अचूक ठरत आहेत. (PTI)
श्रेयस अय्यरने आतापर्यंत न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या चार टी20 सामन्यांमध्ये चारवेळा टॉस जिंकला आहे. त्याशिवाय या प्लेयरने आपल्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्डही केला आहे. (PTI)
श्रेयस अय्यर पहिल्या 25 सामन्यात सर्वाधिक टॉस जिंकणारा कॅप्टन बनला आहे. त्याने 25 पैकी 19 सामन्यात टॉस जिंकला आहे. डॅरेन सॅमी आणि सलमान अली आगाला मागे टाकलं. त्यांनी प्रत्येकी 17-17 वेळा टॉस जिंकलेला. (PTI)
श्रेयस अय्यरला टॉस जिंकल्याचा फायदाही झाला. विद्यमान टी20 सीरीजमध्ये सुरुवातीच्या तीन सामन्यात टॉस जिंकून मॅचही जिंकली. टीम इंडियाला पहिली फिल्डिंग करण्याचाही फायदा झाला. (PTI)
श्रेयस अय्यरने सलग 8 टी20 सामन्यात टॉस जिंकण्याचा रेकॉर्ड केला आहे. त्याने धोनीचा रेकॉर्ड मोडला आहे. धोनीने सलग सात सामन्यात टॉस जिंकला होता. (PTI)