Shubman Gill : शुबमनची एक नंबर कामगिरी, आता धवन-विराटचा रेकॉर्ड निशाण्यावर, नक्की काय?

Shubman Gill Century: शुबमन गिल याने अफगाणिस्तान विरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दीडशतकी खेळीसह मोठा विक्रम केला. त्यानंतर आता शुबमनच्या निशाण्यावर अंतिम सामन्यात मोठा विक्रम आहे. जाणून घ्या.

| Updated on: Jun 18, 2026 | 6:27 PM
1 / 5
भारताचा कर्णधार शुबमन गिल याने 17 जून रोजी अफगाणिस्तान विरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चाबूक खेळी केली. शुबमनने 154 धावांची खेळी केली. शुबमनच्या एकदिवसीय कारकीर्दीतील  हे नववं शतक ठरलं. शुबमनने यासह मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo Credit : PTI)

2 / 5
शुबमन टीम इंडियासाठी वेगवान 9 शतकं करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. शुबमनने 63 डावांत ही कामगिरी केली. तसेच शुबमन वनडेत टीम इंडियासाठी सर्वात वेगवान 6, 7 आणि 8 वं शतक करणारा फलंदाज आहे. (Photo Credit : PTI)

3 / 5
त्यानंतर आता शुबमनला भारताकडून सर्वात वेगवान 10वं आणि 11वं एकदिवसीय शतक करणारा फलंदाज हा बहुमान मिळवण्याची संधी आहे. सध्या हा विक्रम माजी फलंदाज शिखर धवन आणि विराट कोहली यांच्या नावावर आहे. (Photo Credit : PTI)

4 / 5
शिखर धवन याच्या नावावर भारताकडून सर्वात वेगवान 10 वं एकदिवसीय शतक करण्याचा विक्रम आहे. तर विराट कोहली याने भारतासाठी सर्वात वेगवान 11 वं शतकं ठोकण्याची कामगिरी केली आहे. विराटने  82 डावात हा कारनामा केला होता. (Photo Credit : PTI)

5 / 5
शुबमन एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करतोय. शुबमनचं सातत्य आणि फटकेबाजी पाहता तो हे दोन्ही विक्रम आपल्या नावावर करु शकतो. शुबमनने येत्या 13 डावांत शतक केल्यास तो भारतासाठी वेगवान 10 वनडे शतक करणारा फलंदाज ठरेल. त्यामुळे शुबमन शनिवारी 20 जून रोजी अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात शतक लगावणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Photo Credit : PTI)

Follow Us