लेक पलकपेक्षाही कमी वयाच्या गर्लफ्रेंडशी लग्न करणार होता श्वेता तिवारीचा पूर्व पती

श्वेता तिवारीला घटस्फोट दिल्यानंतर तिचा पूर्व पती राजा चौधरी हा गर्लफ्रेंड शिल्पीशी लग्न करणार होता. शिल्पीचं वय राजाची मुलगी पलक तिवारीपेक्षाही कमी होतं. मात्र या दोघांचंही नातं फार काळ टिकलं नाही.

| Updated on: Aug 16, 2026 | 3:19 PM
1 / 5
अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. श्वेताचा पूर्वी पती राजा चौधरी याने विविध मुलाखतींमध्ये तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राजाने काही हिंदी मालिका आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलंय. एका मुलाखतीत राजाने त्याच्या खासगी आयुष्याविषयी नवा खुलासा केला होता.

2 / 5
श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांनी 1998 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना पलक ही मुलगी आहे. 2007 मध्ये दोघं विभक्त झाले, तेव्हा श्वेताने राजावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. अखेर 2012 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. श्वेता तिवारीसोबतच्या घटस्फोटानंतर राजा चौधरीने दुसऱ्या लग्नाचा विचार केला होता.

3 / 5
2015 मध्ये राजा शिल्पी नावाच्या एका मुलीशी लग्न होणार होता. या दोघांनी काही काळ एकमेकांना डेटसुद्धा केलं होतं. पण राजाचं हे नातंसुद्धा फार काळ टिकलं नाही. "माझी मुलगी पलक तिच्यापेक्षा मोठी असल्याचं सांगून शिल्पी मला सतत आमच्यातील वयाच्या अंतराची आठवण करून देत असते. यामुळेच मी ब्रेकअप केला", असं राजाने सांगितलं होतं.

4 / 5
"मी काही काळ शिल्पीला डेट केलं होतं. पण अचानक तिला जाणवू लागलं की आमच्यात वयाचं खूप अंतर आहे. ती मला सतत बोलून दाखवायची की माझी मुलगी तिच्यापेक्षा मोठी आहे. म्हणून मी शिल्पीला म्हणालो, ठीक आहे, मग आपण वेगळे होऊयात", असं त्याने पुढे सांगितलं.

5 / 5
राजा चौधरीने श्वेता सूदशी दुसरं लग्न केलं होतं. श्वेतापासून विभक्त झाल्यानंतर एका कॉमन मित्राच्या माध्यमातून त्याची कॉर्पोरेट एचआर एक्स्पर्ट श्वेता सूदशी ओळख झाली होती. या दोघांनी 2014 मध्ये साखरपुडा केला आणि 2015 मध्ये लग्न केलं. मात्र या दोघांचंही लग्न फार काळ टिकलं नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us