Shweta Tiwari : हातात देवी, उल्लेख धुरंधरचा, श्वेता तिवारीचं बेडरुममधलं फोटोशूट
Shweta Tiwari : श्वेता तिवारी ही टीव्ही विश्वातील मोठी अभिनेत्री आहे. तिने आपल्या अभिनयाने अनेकांची मन जिंकली आहेत. पडद्यावर अभिनय करण्यासह ती सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपल्या फॅन्सशी कनेक्ट असते.

श्वेता तिवारी अनेकदा आपलं वय आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. या फोटोंमध्येही लोकांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक केलय. टीव्ही अभिनेत्री दिलजीत कौरने कौतुक करताना लिहिलय खूप फ्रेश दिसतेस.

श्वेता तिवारी अलीकडेच तिच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर केलाय. यात ती चील मोडमध्ये दिसतेय. ही पोस्ट लोकांना फार आवडली आहे. कमेंटमधून लोक प्रेम व्यक्त करतायत.

या फोटोंमध्ये श्वेता पुस्तक वाचताना आणि चित्रपट एन्जॉय करताना दिसते. पोस्टमधून तिने सांगितलय की, रणवीर सिंहचा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर तिने तो पुन्हा बघितला.

पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहिलय की, दिवसभराच्या थकव्यानंतर नाइट रुटीन, जेवणं, वाचणं आणि झोपायचं नाटक करणं. धुरंधर चित्रपट पुन्हा बघितला. कॅप्शनमध्ये तिन आपल्या फ्रेंडला सुद्धा टॅग केलय.

सोशल मीडियावर श्वेता खूप एक्टिव असते. याच माध्यमातून तिने सांगितलं की, तिला पुस्तकं वाचायला खूप आवडतात. या पोस्टमध्ये तिच्या हातात देवी नावाचं पुस्तक आहे. रमेश मेनन यांनी हे पुस्तक लिहिलय.