
श्वेता तिवारी स्पेनमध्ये मारबेला येथे फिरायला गेलेली. एका फोटोमध्ये इथली ऐतिहासिक जागा कॅडिज पहायला मिळते. ज्यात आकाशातील सुंदर रंग दिसतात. सनसेटच्या वेळचा नजारा दिसतोय. दुसऱ्या फोटोमध्ये श्वेता तिवारी समुद्र किनारी फिरताना दिसतेय.

श्नेता तिवारी या फोटोमध्ये बार्सिलोनाच्या सग्राडा फॅमिलिया समोर पोज देतेय. हे चर्च यूनेस्कोच्या यादीत आहे. वास्तूविशारद अँटोनी गौडीने हे चर्च डिझाइन केलेलं. मास्टरपीस म्हणून हे चर्च ओळखलं जातं. इथे जाण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन तिकीट बुक करावी लागते.

या फोटोत श्वेता तिवारी जिथे पोज देताना दिसतेय ते मारबेलाच एक ओल्ड टाऊन आहे. ही जागा आपल्या ट्रेडिशनल अंडालूसी वास्तूकलेसाठी ओळखली जाते. सफेद रंगाची इमारत आणि गल्ल्यांमध्ये दगडी काम. यात दिसणारं चर्च 'इग्लेसिया डे नुएस्ट्रा सेनोरा डे ला एनकारनेशन' आहे.

या फोटोत श्वेता तिवारी जिथे दिसतेय ती जागा स्पेनची माउंट टिबिडाबो शिखर आहे. हे चर्च आपल्या गॉथिक वास्तुकलेसाी आकर्षणाचं केंद्र आहे. टिबिडाबो, कोल्सेरोला माउंटेन रेंजची सर्वात उंच जागा आहे. तिथून बार्सिलोना खूप कमालीचं दिसतं.

श्वेता तिवारीचा हा फोटो नेदरलँड एम्सटर्डमचा आहे. ट्रेडिशनल डट कालव्याच्या शेजारी बनलेल्या घरांसाठी हा भाग ओळखला जातो. अभिनेत्री इथे न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी गेली होती. इथे नेचर लवर्ससाठी सुद्धा खास जागा आहे वोंडेलपार्क. त्याशिवाय वॅन गॉग म्यूझियम एनी फ्रँक हाऊस, राइकसम्यूझियम खूप सुंदर जागा आहेत.