सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरच्या नव्या घराच्या प्रेमात तुम्हीही पडाल; अमेय वाघने तर थेट विचारलं, अंघोळीला कधी येऊ?

Siddharth Chandekar Mitali Mayekar New Home: एकंदरीत, सिद्धार्थ आणि मितालीच्या आयुष्यातील हा नवा टप्पा त्यांच्या चाहत्यांसाठीही आनंदाची बातमी आहे. मेहनत, स्वप्नं आणि एकमेकांची साथ यांचं सुंदर उदाहरण ठरणाऱ्या या जोडप्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

| Updated on: Nov 09, 2026 | 8:10 AM
1 / 9
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर. आपल्या अभिनयासोबतच ही जोडी सोशल मीडियावरील पोस्टमुळेही नेहमी चर्चेत असते. दोघेही त्यांच्या आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर. आपल्या अभिनयासोबतच ही जोडी सोशल मीडियावरील पोस्टमुळेही नेहमी चर्चेत असते. दोघेही त्यांच्या आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

2 / 9

आता दिवाळीच्या खास मुहूर्तावर सिद्धार्थ आणि मितालीने चाहत्यांना एक खास सरप्राइज दिलं आहे. या जोडप्याने मुंबईतील आपल्या नव्या घराचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांच्या या नव्या घराची झलक पाहून चाहतेही भारावून गेले आहेत.

3 / 9

सिद्धार्थ आणि मितालीने लग्नानंतर वर्षभरातच मुंबईत स्वतःचं पहिलं घर खरेदी केलं होतं. 2022 मध्ये त्यांनी नव्या घरात प्रवेश केला होता. आता या जोडप्याने मुंबईतच दुसरं हक्काचं घर घेतलं आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर त्यांनी या नव्या घराची खरेदी केली होती. मात्र, या घराची सुंदर झलक त्यांनी दिवाळीच्या निमित्ताने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

4 / 9

विशेष म्हणजे, सिद्धार्थने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने 2017 ते 2026 या प्रवासातील तीन घरांचे फोटो शेअर केले होते. 2017 ते 2019, 2019 ते 2022 आणि 2022 ते 2026 असा त्यांच्या घरांचा प्रवास या फोटोंमधून पाहायला मिळाला.

5 / 9

प्रत्येक घराने त्यांना आयुष्यात काहीतरी नवं शिकवलं, अशी भावना त्याने व्यक्त केली होती. मितालीने शेअर केलेल्या नव्या घराच्या फोटोंमध्ये हॉल, किचन, बेडरूम, डायनिंग एरिया आणि बाथरूमची सुंदर झलक पाहायला मिळते.

6 / 9

घराची आकर्षक रंगसंगती, आधुनिक फर्निचर, इंटिरिअर आणि जागोजागी ठेवलेली इनडोअर प्लांट्स यामुळे घराला एक प्रसन्न आणि आल्हाददायक लूक मिळाला आहे. घरातील प्रत्येक कोपऱ्याची सजावट अत्यंत विचारपूर्वक केल्याचं फोटोंमधून दिसत आहे.

7 / 9

या फोटोंमध्ये सिद्धार्थ, मिताली आणि त्यांच्या लाडक्या श्वानाचीही झलक पाहायला मिळते. या फोटोंना मितालीने दिलेलं कॅप्शनही विशेष लक्ष वेधून घेत आहे. तिने, 'हेच गोकुळ अन् हीच माझी पंढरी' असं लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

8 / 9

सिद्धार्थ आणि मितालीच्या या पोस्टवर मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शिवानी सुर्वे, तितिक्षा तावडे, स्पृहा जोशी, प्रियदर्शिनी इंदलकर आणि नेहा पेंडसे यांच्यासह अनेक कलाकारांनी त्यांच्या नव्या घराचं कौतुक केलं आहे.

9 / 9

अभिनेता अमेय वाघनेही या पोस्टवर खास मजेशीर कमेंट केली. घरातील प्रशस्त बाथरूम पाहून त्याने, “या बाथरूममध्ये अंघोळीला कधी येऊ?” अशी मिश्किल विचारणा केली. त्यावर सिद्धार्थनेही “मी कॉफी करतो, तू अंघोळ करून घे” असं मजेशीर उत्तर दिलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us