Photo : लॉकडाऊनचे साईड इफेक्ट्स! ‘वजनदार’ कलाकार झाले स्लिमट्रीम

लॉकडाऊनमुळे घरात अडकावं लागलेल्या अनेकांनी त्याचा सदउपयोग केल्याचंही पाह्यला मिळालं.(Celebrities lost their weight during Lockdown)

VN | Updated on: Nov 19, 2020 | 1:23 PM
1 / 7
कपिल शर्मा: लॉकडाऊनमुळे घरात अडकावं लागलेल्या अनेकांनी त्याचा सदउपयोग केल्याचंही पाह्यला मिळालं. कॉमेडी किंग कपिल शर्मानं लॉकडाऊन दरम्यान 11 किलो वजन कमी केलं आहे. कपिलनं त्याचं वजन 92 किलोवरुन 81 किलो केलं आहे.

कपिल शर्मा: लॉकडाऊनमुळे घरात अडकावं लागलेल्या अनेकांनी त्याचा सदउपयोग केल्याचंही पाह्यला मिळालं. कॉमेडी किंग कपिल शर्मानं लॉकडाऊन दरम्यान 11 किलो वजन कमी केलं आहे. कपिलनं त्याचं वजन 92 किलोवरुन 81 किलो केलं आहे.

2 / 7

अविका गौर : 'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौरनं लॉकडाऊनचा योग्य उपयोग केला आहे. तिचं फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन आश्चर्यजनक आहे. अविकानं जवळजवळ 13 किलो वजन कमी केलं आहे.

3 / 7

शहनाज गिल : 'बिग बॉस' फेम पंजाबी अभिनेत्री शहनाज गिलनंसुद्धा तिचं 12 किलो वजन कमी केलं आहे. तिनं लॉकडाऊनदरम्यान स्ट्रिक्ट डायट आणि नियमित व्यायाम केला आहे.

4 / 7

सलोनी दैनी : 'गंगूबाई' म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सलोनी दैनीनं लॉकडाऊनमध्ये 22 किलो वजन कमी केलं आहे. तिच्या लठ्ठपणामुळे तिला बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र आता तिचा हा लूक सगळ्यांचं लक्ष वेधत आहे.

5 / 7

कश्मीरा शाह : अभिनेत्री कश्मीरा शाहनं लॉकडाऊनमध्ये 13 किलो वजन कमी केलं आहे. तिनं ट्रान्सफॉर्मेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

6 / 7

कृष्णा अभिषेक : 'द कपिल शर्मा शो'मध्ये सपनाची भूमिका साकारणारा कॉमेडियन कृष्णा अभिषेकनं लॉकडाऊनमध्ये 7 किलो वजन कमी केलं आहे. त्यानं डायट फॉलो करुन वजन कमी केलं आहे.

7 / 7

आरती सिंह : बिग बॉस फेम अभिनेत्री आरती सिंहनं 5 किलो वजन कमी केलं आहे. तिनं वजन कमी करण्यासाठी रोज 40 मिनिट वॉक आणि 50 मिनिट योगा केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us