
सगळ्यांनाच वजन कमी करायचंय, त्यासाठी लोक फार प्रयत्न करतात डायटिंग करतात. आपण कमी खाण्यापेक्षा निरोगी अन्न खाणे चांगले. चला जाणून घेऊया वजन कमी करण्याच्या नावाखाली डायटिंग करणं तुमच्यासाठी कसं भारी पडू शकतं.

डायटिंगमुळे खूप नुकसान होऊ शकतं. बारीक होण्यासाठी जेवण कमी कराल तर कमकुवत व्हाल. रोजची कामे करणे अवघड जाईल इतकी कमजोरी येऊ शकते. शरीरात ऊर्जेची कमतरता असल्यामुळे चिडचिड देखील होईल.

विचार न करता डाएटिंग केल्याने तुमच्या शरीराचे मेटाबॉलिज्म देखील कमकुवत होते. त्यामुळे पुरेसे अन्न खाणे गरजेचे आहे. तसेच नियमित अंतराने हेल्दी खात रहा. नाश्ता, दुपारचे किंवा रात्रीचे जेवण कधीही सोडू नका.

कमी खाल्ले तर पचनसंस्थेवर परिणाम होतो. डायटिंग केलं की फायबर कमी होतं. अनेक पोषक घटकांची शरीरात कमतरता जाणवते. डायजेशन नीट होत नाही. त्यामुळे व्यवस्थित आणि चांगलं खा.

बऱ्याच वेळा लोक कमी कॅलरीयुक्त डाएटमध्ये जेवण टाळू लागतात. परंतु आरोग्य तज्ञ असं न करण्याचा सल्ला देतात. डाएट कोणत्याही पद्धतीचं असो, जेवण वेळेत व्हायला हवं. त्यामुळे दिवसातून कमीत कमी 5 वेळा जेवण घ्या. कमी खा पण जेवण करा.