लक्ष्मी आली हो..; कियारा अडवाणीने दिली ‘गुड न्यूज’; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी आयुष्यातील एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. हे दोघं चिमुकल्या मुलीचे आई-बाबा झाले आहेत. कियाराने मुंबईतील खाजगी रुग्णालयात मुलीला जन्म दिला. या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

| Updated on: Jul 16, 2025 | 8:50 AM
1 / 5
'एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेली बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने गोड बातमी दिली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा हे चिमुकल्या मुलीचे आई-बाबा झाले आहेत. परंतु याची अधिकृत घोषणा अद्याप या दोघांनी केली नाही.

2 / 5
कियारा आणि सिद्धार्थ यांनी 2023 मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या दोन वर्षांनंतर त्यांच्या घरात पाळणा हलला आहे. मुंबईतील रिलायन्स हॉस्पीटलमध्ये कियाराने मुलीला जन्म दिला. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कियाराने प्रेग्नंट असल्याचं जाहीर केलं होतं.

3 / 5
गेल्या आठवड्यात सिद्धार्थ आणि कियाराला मुंबईतील एका क्लिनिकबाहेर पाहिलं गेलं होतं. त्यावेळी पापाराझींनी फोटो किंवा व्हिडीओ काढू नये म्हणून त्यांनी छत्रीचा वापर केला होता. यावेळी सिद्धार्थ आई रिमा मल्होत्रा आणि कियाराचे आईवडीलसुद्धा उपस्थित होते.

4 / 5
आमच्या आयुष्यातील सर्वांत मोठी भेट लवकरच येत आहे.. असं कॅप्शन देत कियाराने गरोदरपणाची बातमी जाहीर केली होती. प्रेग्नंसीदरम्यान तिने 'मेट गाला'मध्येही पदार्पण केलं होतं. गौरव गुप्ताने डिझाइन केलेला गाऊन तिने परिधान केला होता आणि पहिल्यांदाच तिने बेबी बंपसह फोटोसाठी पोझ दिले होते.

5 / 5
'शेरशाह' या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर 7 फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांनी राजास्थानमधील सूर्यगड पॅलेसमध्ये थाटामाटात लग्न केलं होतं. सध्या या दोघांवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.