Onion prices : कांद्याच्या दरात मोठी घसरण, शेतकऱ्यांची चिंता वाढली, ऐन दुष्काळात मोठा फटका

लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या नऊ दिवसांत कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल 1 हजार 749 रुपयांची घसरण झाली आहे. यंदा आधीच दुष्काळ आहे, त्यामध्ये आता कांद्याच्या दरात देखील मोठी घसरण झाल्याने त्याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे.

| Updated on: Nov 26, 2026 | 4:31 PM
1 / 5
लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या नऊ दिवसांत कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल 1 हजार 749 रुपयांची घसरण झाली आहे.

लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या नऊ दिवसांत कांद्याच्या दरात प्रतिक्विंटल 1 हजार 749 रुपयांची घसरण झाली आहे.

2 / 5

यंदा आधीच दुष्काळ आहे, त्यामध्ये आता कांद्याच्या दरात देखील मोठी घसरण झाल्याने त्याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे.

3 / 5

कांद्याचे दर आता थेट प्रतिक्विंटल चार हजार रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

4 / 5

देशांतर्गत बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा अधिक होत आहे, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानचा कांदा स्वस्त मिळत असल्याने कांद्याचे दर घसरले आहेत.

5 / 5

बाजारभावातील घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us