59 वर्ष जुन्या चित्रपाटतील गाणं, बहिणीच्या नवऱ्यासोबत रोमान्स; वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीने गाजवला होता सिनेमा

बॉलिवूडमध्ये काही कलाकारांनी कमी काळ काम करूनही प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली. अशीच एक अभिनेत्री म्हणजे सिंपल कपाड़िया. डिंपल कपाड़िया यांची बहीण असलेल्या सिंपल यांनी अभिनयासोबतच कॉस्ट्यूम डिझाइनमध्येही मोठे यश मिळवले. मात्र तुम्हाल माहिती आहे का त्यांनी एका अशा चित्रपाटतून सिनेसृष्टीत पदार्पण केलं ज्यात त्यांचे सहकलाकार राजेश खन्ना होते.

| Updated on: Nov 10, 2026 | 8:21 PM
1 / 5
सिंपल कपाड़िया यांचा जन्म 15 ऑगस्ट 1958 रोजी झाला. 1977 मध्ये 'अनुरोध' या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात त्यांना राजेश खन्ना यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.राजेश खन्ना हे खऱ्या आयुष्यात सिंपल याचे भावोजी(जीजा) आहेत.

सिंपल कपाड़िया यांचा जन्म 15 ऑगस्ट 1958 रोजी झाला. 1977 मध्ये 'अनुरोध' या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात त्यांना राजेश खन्ना यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.राजेश खन्ना हे खऱ्या आयुष्यात सिंपल याचे भावोजी(जीजा) आहेत.

2 / 5

सिंपल यांनी जवळपास 10 वर्षे अभिनय क्षेत्रात काम केले. 'लूटमार', 'जमाने को दिखाना है', 'जीवन धारा' आणि 'दूल्हा बिकता है' हे त्यांचे काही चित्रपट आहेत. मात्र, अभिनयात त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.

3 / 5

1987 मध्ये 'परख' चित्रपटानंतर त्यांनी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी फॅशन आणि डिझाइनिंग क्षेत्राकडे लक्ष दिले. याच क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

4 / 5

अभिनय सोडल्यानंतर सिंपल यांनी कॉस्ट्यूम डिझायनर म्हणून काम सुरू केले. हळूहळू त्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध डिझायनर बनल्या. त्यांच्या कामाचे चित्रपटसृष्टीत कौतुक झाले.

5 / 5

1993 मधील 'रुदाली' चित्रपटासाठी त्यांनी डिंपल कपाड़िया यांच्यासाठी राजस्थानी वेशभूषा तयार केली. या कामासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट वेशभूषा डिझाइनचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. अभिनयापेक्षा वेगळ्या क्षेत्रातही त्यांनी आपली प्रतिभा सिद्ध केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us