
कलाकार हे कायमच चर्चेत असतात. अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नुकताच एका गायिकेने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. तिने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. चला जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे?

मराठी सा रे ग म प लिटिल चॅम्प्समधून प्रसिद्ध झालेली गायिका आनंदी जोशीसोबत हा प्रकार घडला आहे. तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर धक्कादायक घटनेचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

पहिल्या स्टोरीमध्ये आनंदीने हा व्यक्ती गेल्यावर्षी माझ्या कॉन्सर्टसाठी आला होता. त्याने त्यावेळी माझ्यासोबत काढलेला हा फोटो सुद्धा पोस्ट केला आणि मला पर्सनलला मेसेज करून तो माझ्या कामाचे कौतुक देखील केले होते. आज सकाळी मी पाहते तर मला हा मेसेज दिसला असे म्हटलेय

दुसऱ्या स्टोरीमध्ये तिने स्क्रीनशॉट शेअर केला. त्यामध्ये खाली आनंदीचा फोटो आहे आणि त्याखाली लिहिले की क्लिवेज बघ किती डीप आहे. त्यानंतर पुढच्या स्टोरीमध्ये आनंदीने म्हटले की, खरंतर त्याला हा फोटो त्याच्या दुसऱ्याच मित्राला कोणालातरी पाठवायचा होता. पण त्याने तो चुकून मलाच पाठवला. मी त्याला मेसेजही केला की तू चुकून मलाच मेसेज केला आहेस का? मग त्याने तो मेसेज डिलीट केला.

पुढे आनंदीने म्हटले की, हे एक बालरोगतज्ज्ञ (Pediatrician)बद्दल आहे. जो एका मुलीला एक व्यक्ती म्हणून पाहणं टाळतो आणि तिच्या शरीरावरती असं बोलतो. त्याला मुलांच्या शरिराला स्पर्श करण्याचा अधिकार आहे. बोलू शकत नसलेल्या आणि स्वतःचा बचाव करू शकत नसलेल्या बाळांना आणि लहान मुलांसोबत संपर्क साधण्याची त्याला परवानगी असते. ही गोष्ट मला खरंच भीतीदायक वाटते आहे. लोकांनी सांभाळून राहावं.

त्यानंतर आनंदीने त्या कमेंट करणाऱ्या क्लिनिकचा पत्ता शोधला. त्या व्यक्तीचे नाव सांगितले आणि त्याचे बाणेर पुणे येथे क्लिनिक आहे असे म्हटले.