सुदेश भोसले यांच्या लेकीचं थाटामाटात लग्न; मराठी अभिनेत्याशी बांधली लग्नगाठ

गायक सुदेश भोसले यांची कन्या श्रुती भोसलेचा नुकताच विवाहसोहळा पार पडला. पुण्यात अत्यंत थाटामाटात पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला अभिनेत्री तेजश्री प्रधानसुद्धा उपस्थित होती. या लग्नाचे फोटो आता समोर आले असून चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

| Updated on: Nov 12, 2025 | 1:08 PM
1 / 5
प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांची कन्या श्रुती भोसलेनं नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. लोकप्रिय मराठी अभिनेता प्रतिक देशमुखशी तिने लग्न केलंय. पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये अत्यंत थाटामाटात हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

2 / 5
श्रुती आणि प्रतिक यांनी महिनाभरापूर्वी साखरपुडा केला होता. या दोघांच्या लग्नाला कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता. सोमवारी 10 नोव्हेंबर रोजी हा विवाहसोहळा पार पडला. श्रुतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो पोस्ट केले असून चाहत्यांनी त्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

3 / 5
लग्नात श्रुतीने लाल रंगाची साडी नेसली होती. तर प्रतिकने फिकट नारंगी रंगाची शेरवानी घातली होती. श्रुती आणि प्रतिकचा हा वर-वधूच्या रुपातील लूक नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे. 10/11/2025 अशी लग्नाची तारीख कॅप्शनमध्ये लिहित दोघांनी फोटो पोस्ट केले आहेत.

4 / 5
श्रुती आणि प्रतिक यांच्या लग्नाला अभिनेत्री तेजश्री प्रधानसुद्धा उपस्थित होती. तेजश्री आणि प्रतिक हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे तेजश्रीनेही फोटो पोस्ट करत दोघांना त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

5 / 5
लेकीच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये खुद्द सुदेश भोसले यांनी गाणं सादर केलं होतं. त्यांच्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ तेजश्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला होता. प्रतिक देशमुख हा अभिनेता, लेखक आणि निर्मातासुद्धा आहे. त्याने इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे.