
आजकाल एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. लोक जमेल तेवढी रक्कम एसआयपीमध्ये गुंतवतात. एसआयपीत दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.

परंतु काही लोक एक मोठी चूक करतात. एसआयपी करताना काही लोक प्रत्येक महिन्यालाा निश्चित केलेली रक्कम कधी-कधी गुंतवतच नाहीत. घरात आणीबाणीची स्थिती आली किंवा आरोग्याची समस्या निर्माण झाली की आपण एसआयपी थांबवतो.

एक किंवा दोन महिने एसआयपी थांबवली तर फार तोटा होणार नाही? असा प्रत्येकाचा समज असतो. परंतु एसआयपीमध्ये गुंतवलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. म्हणूनच तुम्हाला खूप मोठा तोटा होऊ शकतो.

साधारण प्रत्येक वर्षाला तुम्ही तीन महिने एसआयपी न केल्यास तुम्हाला तोटा किती होऊ शकतो, हे समजून घेऊ या. समजा तुम्ही एकूण 30 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 20 हजार रुपये गुंतवत असाल आणि या गुंतवणुकीदरम्यान तुम्ही प्रत्येक वर्षाला तीन महिने गुंतवणूकच केली नाही तर काय फटका बसू शकतो, हे पाहुयात.

तुम्ही प्रत्येक महिन्याला 20 हजार रुपयांची गुंतवणूक करत असला आणि त्यावर 12 टक्क्यांनी रिटर्न्स मिळत असतील तर पुढच्या 30 वर्षात तुम्हाला व्याजासहित जवळपास 6,16,19,464 रुपये मिळतील. परंतु तुम्ही प्रत्येक वर्षाला तीन महिने एसआयपी न केल्यास तुमचा साधारण 1.52 कोटी रुपयांचा फटका बसू शकतो. तुम्हाला मिळणारी रक्कम थेट 5 कोटी रुपये होईल.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)