SIP की NPS? महिन्याला 5000 हजारांची बचत करा अन् व्हा करोडपती
तुम्ही महिन्याला 5000 हजारांची बचत करून करोडपती होऊ शकता. त्यासाठी तुम्हाला पैशांसाठी योग्य नियोजन करावे लागेल.

- तुमच्या सेवानिवृत्तीसाठी आतापासूनच महिन्याला 5 हजारांची गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. तुम्ही सलग 30 वर्ष ही गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. परंतु अनेकांचा NPS की SIP मध्ये गुंतवणूक करावी, यावरून गोंधळ उडतो.
- तुम्ही SIP मध्ये दरमहा पाच हजारांची गुंतवणूक केल्यास सरासरी 12 टक्के प्रमाणानुसार 1.76 कोटींचा निधी तयार होऊ शकतो. एनपीएसमध्ये सरासरी 10 टक्के परतावा मिळतो. त्यानुसार तुमच्या खात्यात 1.14 कोटींचा निधी तयार होऊ शकतो. तुम्हाला दिसून येत आहे की, SIP अंदाजित निधी हा NPS पेक्षा 62 लाखांनी जास्त आहे.
- एसआयपीमध्ये 12 टक्क्यांच्या परताव्यानुसार, अंदाजित निधी हा 1.76 कोटी आहे. तर यात अंदाजित परतावा हा 1.58 कोटी इतका आहे. एनपीएसमध्ये 10 टक्के वार्षिक परताव्यानुसार अंदाजित निधी 1.14 कोटी रुपये मिळेल. या अंदाजित रिटर्न हा 96 लाख इतका आहे. दोन्ही परताव्यामध्ये 2 टक्क्यांचा फरक आहे.
- खरंतर एसआयपीमध्ये परतावा निश्चित नसतो. इक्विट म्युच्युअल फंड हा शेअरबाजाराशी जोडला गेलेला असतो. त्यामुळे एखाद्या वर्षी फायदा होऊ शकतो. तर काही वर्षांत तोटा होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर एनपीएसमध्येही 10 टक्के परतावा निश्चित नसतो.
- सेवानिवृत्तीसाठी पैसे वाचवायचे असेल, तुम्हाला गुंतवणूक दीर्घकाळ करायची असेल, एनपीएस योजना फायदेशीर ठरू शकते. महिन्याला 5000 हजारांची गुंतवणूक केल्याचा एसआयपीचा अंदाजित निधी 1.76 कोटी इतका तयार होतो .तर एनपीएसमध्ये निधी हा 1.14 कोटी रुपये इतका होतो. फक्त परतावा पाहून गुंतवणूक करू नये. तुम्ही बाहेर पडण्याचेही नियम पाहणे गरजेचे आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us