कुरूप म्हणत आई-वडिलांनी सोडली साथ; 4 लग्न, इस्लाम स्वीकारला अखेर… 70 च्या दशकातील अभिनेत्रीची कहाणी
भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार कथकला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या महान नृत्यांगनांचा जन्म आजच्याच दिवशी 8 नोव्हेंबर 1920 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांना 'कथकची राणी' म्हणून ओळखले जात असे. नृत्यकलेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या सितारा देवी यांचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. मात्र त्यांच्या आयुष्यातील एका घटीकेला त्यांच्या घरच्यांनी त्यांची साथ सोडली कारण सांगितलं तु करुप आहेस त्यामुळे तुझं पुढे काय भविष्य नाही. अशा परिस्थितही त्या खंबीर राहिल्या आणि स्वतःला सिद्ध केलं.

सितारा देवी यांचे मूळ नाव धनलक्ष्मी होते. घरातील मंडळी त्यांना प्रेमाने धन्नो म्हणत असत. त्यांचे वडील सुकदेव महाराज संस्कृतचे अभ्यासक आणि कथक गुरू होते, तर आई मथुरा देवी यांनाही पारंपरिक नृत्याची जाण होती.
लहानपणापासूनच त्यांना नृत्याची आवड होती. वडिलांकडून त्यांनी कथकचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले. वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी त्यांनी पहिला नृत्यप्रयोग सादर केला.
वयाच्या 12 व्या वर्षी त्या एकट्याच मुंबईत आल्या आणि 16 व्या वर्षी 'नागिन' चित्रपटातून पडद्यावर झळकल्या. त्यांच्या नृत्याने प्रभावित होऊन रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना 'नृत्य सम्राज्ञी' ही उपाधी दिली होती. त्यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये नृत्य सादर केले.
सितारा देवी यांच्या आयुष्यात चार विवाह झाल्याचे सांगितले जाते. त्यांचे श्री देसाई, अभिनेता नजीर अहमद खान, दिग्दर्शक के. आसिफ आणि गुजराती व्यावसायिक प्रताप बारोट यांच्याशी विवाह झाले होते. मात्र, त्यांचे पहिले तीन विवाह टिकू शकले नाहीत.
कथक कलेतील योगदानासाठी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, पद्मश्री आणि कालिदास सन्मान मिळाला. मात्र, पद्मभूषण स्वीकारण्यास त्यांनी नकार देत भारतरत्नची मागणी केली होती. 25 नोव्हेंबर 2014 रोजी वयाच्या 94 व्या वर्षी त्यांचे निधन झाले, पण त्यांची कला आजही स्मरणात आहे.