
हानिकारक यूव्ही किरणांच्या संपर्कात आल्याने आपली त्वचा टॅन होते. हे टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही अनेक नैसर्गिक गोष्टींचा वापर करू शकता. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक येण्यास मदत होईल.

कोरफड व लिंबाचा रस - एका बाऊलमध्ये थोडा कोरफडीचा रस घ्या, त्यामध्ये थोडा लिंबाचा रस मिसळावा. हे दोन्ही पदार्थ नीट एकत्र मिसळावे आणि मानेवर व चेहऱ्यावर लावावे. 10 मिनिटांनंतर चेहऱ्यावरील मिश्रण सुकले की चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा.

बेसन व दही - एका भांड्यात एक चमचा बेसन घ्या. त्यात 2 चमचे दही घाला. त्यामध्ये थोडा कोरफडीचा रस टाका. या सर्व गोष्टी मिसळा आणि चेहरा आणि मानेला लावा. 30 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

हळद आणि बेसन - हळदीचे औषधी गुणधर्म तर सर्वांनाच माहीत आहेत. सौंदर्यप्रसाधन म्हणूनही हळदीचा वापर करता येतो. टॅनिंग घालवण्यासाठी तुम्ही हळद व बेसन यांचा वापर करू शकता. त्यासाठी एका बाऊलमध्ये अर्धा चमचा हळद घ्या. त्यात एक चमचा बेसन मिसळा. त्यात थोडं दही घाला. या सर्व गोष्टी मिसळून पेस्ट तयार करा व चेहरा आणि मानेला लावा. हे मिश्रण चेहऱ्यावर 20 ते 30 मिनिटे राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

मूगडाळ व टोमॅटो - एका भांड्यात मूग डाळ थोडा वेळ भिजत ठेवा. नंतर या डाळीची पेस्ट बनवा. त्यात टोमॅटोची पेस्ट घाला व मिश्रण एकत्र करा. हे मिश्रण चेहरा व मानेवर लावून 20 मिनिटे ठेवावे. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे टॅनिंग कमी होऊन चेहऱ्यावर चमक येण्यास मदत होईल.