आपल्या शरीरावर बहुतेक ठिकाणी केस असतात. ते काढण्यासाठी बऱ्याच महिला वॅक्सिंगची मदत घेतात. पण ते करताना नीट काळजी घ्यावी लागते. काही चूक झाल्यास त्वचेवर रॅशेस येणे, अथवा त्वचा लाल होणे असा त्रास सहन करावा लागू शकतो. वॅक्सिंग करताना कोणत्या चुका टाळाव्यात ते जाणून घेऊया.

वॅक्सिंग करताना काही लोक जास्त वॅक्स वापरतात, त्यामुळे जास्त केस निघतील असं त्यांना वाटतं . पण त्यामुळे वेदनाही होऊ शकतात. म्हणून नेहमी वॅक्सचा पातळ थर लावावा.

स्वच्छतेची नीट काळजी घेतली नाही तर वॅक्सिंगनंतर त्रास होऊ शकतो. अशा वेळी अस्वच्छ कापड किंवा टॉवेलचा वापर केल्यास त्वचेचा खाज येणे, लाल होणे असा त्रास होऊ शकतो. म्हणून नेहमी स्वच्छता बाळगा.

स्वच्छतेची नीट काळजी घेतली नाही तर वॅक्सिंगनंतर त्रास होऊ शकतो. अशा वेळी अस्वच्छ कापड किंवा टॉवेलचा वापर केल्यास त्वचेचा खाज येणे, लाल होणे असा त्रास होऊ शकतो. म्हणून नेहमी स्वच्छता बाळगा.

वॅक्स करताना लोक नकळतपणे जखम झालेल्या ठिकाणीही वॅक्स लावतात. अशामुळे स्किन प्रॉब्लेम्स किंवा त्वचा निघणे व बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याच धोका असू शकतो. जे त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकते.

वॅक्सिंग केल्यानंतर लगेच उन्हात गेल्यास त्वचा टॅन होऊ शकते. म्हणून असे करणे टाळावे.