
आजकाल बहुतेक घरांमध्ये स्मार्ट टीव्ही असतात. हल्ली बरेच लोक मोठ्या स्क्रीनचे टीव्ही विकत घेत आहेत. मात्र, टीव्ही किती अंतरावरून पाहावा याची माहिती फार कमी लोकांना असते.

टीव्ही खूप जवळून पाहिल्यास तुमच्या डोळ्यांना नुकसान होऊ शकते. तुमच्या घरात ३२ इंच, ४३ इंच, ५५ इंच किंवा त्याहून मोठा टीव्ही असेल, तर तो एका ठरविक अंतरावरून पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

तुमच्या खोलीतील प्रकाशाचे प्रमाण किती हा विचार करुनच टीव्ही खरेदी करावा. योग्य डिस्प्ले असलेला टीव्ही निवडण्यासाठी याचा कायम उपयोग होतो. जर तुमची खोली लहान असेल आणि तुम्ही जवळून टीव्ही पाहत असाल, तर तुमच्यासाठी ३२ ते ४३ इंचाचा टीव्ही पुरेसा आहे. हे टीव्ही किमान ४ ते ६ फूट अंतरावरून पाहिल्यास डोळ्यांवर फारसा ताण येत नाही.

जर तुमच्या खोलीत मोठ्या स्क्रीनचा टीव्ही असेल, तर तो दूरवरून पाहणे आवश्यक आहे. ४३ ते ५५ इंचाचा टीव्ही सुमारे ६ ते ८ फूट अंतरावरून पाहण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

काहींना घरी थिएटरसारखा अनुभव हवा असतो. अशावेळी तुम्ही ५५ इंचापेक्षा मोठे टीव्ही घेऊ शकता. जो उत्तम ठरु शकतो. पण, हे टीव्ही जवळून पाहणे मोठी चूक ठरु शकते. ५५ इंच आणि त्याहून अधिक आकाराचे टीव्ही ८ फुटांपेक्षा जास्त अंतरावरून पाहणे डोळ्यांसाठी चांगले आहे.

टीव्ही निवडताना तो तुमच्या गरजेनुसार निवडावा. जर तुम्हाला घरगुती आणि रोजच्या वापरासाठी एलसीडी किंवा एलईडी डिस्प्ले असलेला स्मार्ट टीव्ही उत्तम ठरु शकतो. पण जर तुम्ही चित्रपटांचे शौकीन असाल तर ओएलईडी डिस्प्ले असलेला स्मार्ट टीव्ही निवडा.

जर तुमच्या खोलीत खूप प्रकाश असेल किंवा थेट सूर्यप्रकाश येत असेल, तर उत्कृष्ट ब्राइटनेससाठी क्यूएलईडी (QLED) डिस्प्ले असलेला स्मार्ट टीव्ही विचारात घ्या. स्मार्ट टीव्ही खरेदी करताना व्हॉइस कंट्रोल, बिल्ट-इन वाय-फाय, अॅप सपोर्ट, स्क्रीन मिररिंग याचा कायमच विचार करावा.

या वैशिष्ट्यांमुळे टीव्ही पाहण्याचा अनुभव अधिक चांगला होतो. तसेच टीव्ही वापरणे सहज सोपे होते. मात्र जर याकडे दुर्लक्ष केलात, तर तुमचा पैसा वाया जाऊ शकतो.