Snakes : घरातल्या या गोष्टीला सापही थरथर कापतो, आठवणीने ठेवा, साप चुकूनही…
भारतात दरवर्षी हजारो लोक सर्पदंशामुळे बळी पडतात. ग्रामीण भागात तसेच शेते किंवा जंगलांच्या जवळ राहणाऱ्या लोकांसाठी हा धोका विशेषतः जास्त असतो. पावसाळ्यात तर घरातही साप शिरण्याचा धोका असतो. अशा वेळी घरातील ही एक गोष्ट खूप उपयोगी पडू शकते.

पावसाळ्यात सापांचा धोका सर्वाधिक असतो. मात्र, जिथे सापांशी सामना होण्याची शक्यता जास्त असते, अशा भागांत राहणाऱ्या लोकांना तर जीव मुठीत धरून जगावं लागतं. कधी कुठून साप येईल सांगू शकत नाही. पण आता अशा ठिकाणी किंवा जनरलच सापांपासून बचाव करायचा असेल तर तंत्रज्ञान खूप उपयुक्त ठरू शकते. भारतात दरवर्षी हजारो लोक सर्पदंशाला बळी पडतात; विशेषतः गावे, शेतीचे परिसर आणि जंगलांच्या आसपास राहणाऱ्या लोकांसाठी हा धोका अधिक गंभीर असतो. याच पार्श्वभूमीवर, काही विशेष मोबाईल ॲप्स समोर आली आहेत. लोकांना सापांविषयी माहिती देणे, जास्त धोका असलेल्या भागांची ओळख पटवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य त्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करणे यांद्वारे ही ॲप मदत करतात. आज आपण अशा एका ॲपबद्दल जाणून घेणार आहोत, जे सापांपासून सुरक्षित ठेवेल आणि साप घरात शिरण्यापूर्वीच तुम्हाला सावध करेल. ( All Photos : Social Media)

Big 4 Mapper हे सापांविषयी माहिती देणाऱ्या ॲप्सपैकी एक आहे. या ॲपचे एक वैशिष्ट्य म्हणजे याची मॅप आधारित सिस्टीम, याद्वारे युजर्सना, त्यांच्या परिसरात यापूर्वी साप कुठे आढळला होता, हे पाहता येतं आणि जास्त धोकादायक मानले जाणारे भाग ओळखता येतात. यामुळे लोकं सतर्क राहतात आणि अशा भागात जाणे टाळता येतं. ही सुविधा, शेतात काम करणारे शेतकरी, जंगलांजवळ राहणारे लोक आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडणाऱ्यांसाठी विशेषतः उपयुक्त मानली जाते. हे ॲप जीपीएस (GPS)-आधारित लोकेशन सिस्टीमचा वापर करते, ज्यामुळे धोक्याची क्षेत्रं ओळखणं सोपं होतं.

समोर आलेला साप विषारी आहे की नाही, हे अनेक लोकांनाओळखता येत नाही. अशा वेळी, हे ॲप विविध प्रजातींची छायाचित्रे आणि माहिती उपलब्ध करून देतं, ज्यामुळे सापाची ओळख पटवणंही खूप सोपं होतं.

या शिवाय, यात भारतातील सर्वात धोकादायक मानल्या जाणाऱ्या विषारी सापांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. यामध्ये कोब्रा (नाग), कॉमन क्रेट, रसेल्स व्हायपर आणि सॉ-स्केल्ड व्हायपर यांचा समावेश आहे. देशात सापाच्या दंशाने होणाऱ्या मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यूंसाठी या विशिष्ट प्रजातीच कारणीभूत आहेत.

सापाने दंश केल्यास, काय करावे याबद्दल देखील हे ॲप लगेच आणि अत्यंत महत्त्वाचा सल्ला देते. अशा परिस्थितीत लोक अनेकदा घाबरून जातात आणि घरगुती उपाय किंवा पारंपरिक पद्धतींचा अवलंब करतात, ज्यामुळे रुग्णाची स्थिती अधिक बिघडू शकते. मात्र अशा वेळी हे ॲप युजर्सना त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचे आणि प्रथमोपचाराच्या योग्य पद्धतींचे पालन करण्याचे मार्गदर्शन करतं.

या ॲप्सव्यतिरिक्त, अनेक राज्यांमध्ये अशा प्रणाली विकसित करण्यात आल्या आहेत ज्या साप दिसताच त्याची माहिती थेट प्रमाणित सर्पमित्र पथकं आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवतात. यामुळे सापाला सुरक्षितपणे पकडणं शक्य होतं आणि त्याचबरोबर लोकांनाही धोक्यापासून संरक्षण मिळतं.