
सापांचं विश्व हे मोठं गुढ आहे. आतापर्यंत सापाच्या अनेक प्रजातींचा शोध लागलेला आहे. यातील काही प्रजाती या अतिशय विषारी असतात तर काही साप हे पूर्णपणे बिनविषारी असतात. यामुळेच सांपाच्या दुनियेबद्दल माणसाला उत्सुकता असते.

सापाला पाहिलं की आपण घाबरून जातो. सापाने दंश केल्यामुळे मृत्यू होण्याची भीती असते त्यामुळे आपण खबरदारी म्हणून सापापासून दूर पळतो. याच सापांच्या दुनियेत आता एका आगळ्यावेगळ्या प्रजातीचा शोध लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ब्राझीलच्या घनदाट जंगलात एक अजब साप सापडला आहे. हा सा हिरव्या रंगाचा असून त्याची लांबी 32 इंची आहे. या सापाला चक्क मिशा आहेत.

सापाच्या तोंडावर एक गडत काळ्या रंगाची रेष आहे. ही रेष दुरुन एखाद्या मिशीप्रमाणे भासते. संशोधकांनी या सापाच्या डीएनएचा अभ्यास केला आहे. अभ्यासानंतर संशोधकांनी या सापाचा Parrot Snake या प्रजातीत समावेश केला आहे.

दरम्यान, संशोधकांच्या मते ही प्रजाती फार जुनी आहे. या सापाच्या दातांची रचनादेखील फार वेगळी आहे. सापाची ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच या प्रजातीचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.