
सापाच्या विषामध्ये न्यूरोटॉक्सिन किंवा हेमोटॉक्सिन हे घटक असतात. हे घटक शरीरात गेल्यास नसा आणि रक्तावर परिणाम होतो. यामुळे वेळेवर उपचार मिळाले नाही तर मृत्यू होऊ शकतो.

विंचू या प्राण्याच्या विषामध्येही न्यूरोटॉक्सिन आढळते. विंचूचे विष नसांवर परिणाम करून शरीराच्या अवयवांना निकामी करते. परंतु विंचू चावताना खूप कमी प्रमाणात विष सोडतो. त्यामुळे याचा फारसा परिणाम आरोग्यावर होत नाही.

विंचूचे विष सापाच्या विषापेक्षा रासायनिकदृष्ट्या जास्त विषारी असते. मात्र विंचू चावताना कमी प्रमाणात विष सोडतो त्यामुळे मानवाच्या जीवाला धोका निर्माण होत नाही. मात्र साप चावताना मोठ्या प्रमाणात विष सोडतो, त्यामुळे मानवाचा मृत्यू होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते विंचूचे विष खतरनाक असते, जे काही मिनिटांमध्ये अवयव निकामी करते. यामुळे यामुळेच उष्ण भागात आढळणारे मोठे विंचू मानवांसाठी धोकादायक असतात.

विंचूच्या 2500 प्रजाती आढळतात, त्यातील जवळपास 30 प्रजाती मानवांसाठी धोकादायक असतात. सापाच्या जगात 3000 आणि भारतात 300 प्रजाती आढळतात. भारतात 7-8 प्रजाती मानवासाठी धोकादायक असतात.