
या यादीत पहिलं नाव येतं ते स्नेहा उल्लालचं. 2005 मध्ये रिलीज झालेल्या 'लकी नो टाईम फॉर लव्ह' या चित्रपटातून स्नेहाने सलमान खानसोबत डेब्यू केलं. मात्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकला नाही. मात्र, स्नेहा ही ऐश्वर्या रायसारखी दिसत असल्याने ती खूप चर्चेत आली. सलमान खानसोबत डेब्यू केल्यानंतरही स्नेहा इंडस्ट्रीत काही खास छाप पाडू शकली नाही आणि काही चित्रपटांनंतर ती इंडस्ट्रीतून गायब झाली.

'तेरे नाम' या चित्रपटातून भूमिका चावलाने पदार्पण केले. सलमान - भूमिका यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट सुपर-डुपर हिट ठरला. मात्र, या चित्रपटातून डेब्यू केल्यानंतरही भूमिका चावलाची कारकीर्द चांगली चालली नाही.

सलमान खानच्या 'वीर' या चित्रपटातून जरीन खानने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मात्र, ती फारशी यशस्वी ठरली नाही. कतरिना कैफच्या चेहऱ्याशी असलेलं साधर्म्यही जरीन खानचं करीअर वाचवू शकलं नाही.

सोनाक्षी सिन्हाने सलमान खानसोबत 'दबंग' चित्रपटातून डेब्यू केलं. हा चित्रपट सुपर-डुपर हिट ठरला. सोनाक्षीचे थोडेफार चित्रपट चालले, पण ती खूप यशस्वी ठरली नाही.

डेझी शाहने सलमान खानच्या 'जय हो' चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. पण डेझी शाह देखील बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवू शकली नाही.