Soha Ali Khan : लग्नाआधी एकत्र राहणार असाल, तर काही पुरुष हे..शर्मिला टागोर यांनी मुलीला काय सल्ला दिलेला?

Soha Ali Khan :पतौडी कुटुंबातील मुलगी सोहा अली खानने वर्ष 2015 मध्ये अभिनेता कुणाल खेमू सोबत लग्न केलं. पण लग्नाआधी सोहा आणि कुणाला अनेक वर्ष लिव इन रिलेशनशिपमध्ये राहिले.

| Updated on: Sep 15, 2025 | 4:13 PM
1 / 5
Hauterfly ला दिलेल्या एका लेटेस्ट इंटरव्यूमध्ये सोहाने सांगितलं की, तिची आई शर्मिला टागोर नेहमीच मोकळ्या विचारांची राहिली आहे. त्यांनी मुलांच्या निर्णयात कधी हस्तक्षेप केला नाही.

2 / 5
पण सोहाने जेव्हा कुणालसोबत लिव इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी आई शर्मिला टागोरने तिला खास सल्ला दिलेला. सोहाने सांगितलं की, माझ्या आईने मला एक गोष्ट सांगितलेली की, लग्नआधी तुम्ही दोघे सोबत राहणार असाल, तर काही पुरुष असे असतात, जे लग्नाला उशीर करतात. त्यांच्यावर दबाव टाकावा लागतो.

3 / 5
लिव इन मध्ये राहिल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडून लग्नाच्या प्रस्तावाची वाट पाहत असाल, तर  सोबत राहिल्यानंतर कदाचित मुलाला लग्नाची मागणी घालण्यासाठी काही खास कारण दिसणार नाही, अशी शर्मिला टागोर सोहाला म्हणालेल्या.

4 / 5
म्हणून तुम्ही जर सोबत राहण्याचा विचार करत असाल, तर या गोष्टीचा सुद्धा विचार करा. आम्ही लिव इन मध्ये राहण्याआधी अम्मा म्हणजे शर्मिला टागोर यांनी हा सल्ला दिलेला.

5 / 5
अखेर कुणालने मला प्रपोज केलं. आम्ही लग्न केलं. आम्ही नात्याच्या भविष्याबद्दल जरुर बोललेलो. पण त्यासाठी कुठली जबरदस्ती नव्हती. कारण लग्न आमच्यासाठी जास्त आवश्यक नव्हतं असं सोहा म्हणाली. आम्ही सोबत राहून आनंदी होतो. पण दुसऱ्या लोकांची इच्छा होती की, आम्ही लग्न करावं. जेणेकरुन आमचं कुटुंब व्हावं. म्हणून आम्ही त्यांच्यासाठी हा निर्णय घेतला, लग्न केलं.