खान कुटुंबाच्या पूर्व सुनेला हवाय तरुण पार्टनर? म्हणते, ‘आता मला…’

Sohail Khan's ex wife: अभिनेता सोहैल खानची पूर्व पत्नी सीमा सजदेह नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. घटस्फोटानंतरचं आयुष्य कसं आहे, भविष्यात कसा पार्टनर हवा याविषयी तिने सांगितलं आहे.

| Updated on: Aug 23, 2026 | 7:43 AM
1 / 5
अभिनेता सोहैल खानची पूर्व पत्नी आणि फॅशन डिझायनर सीमा सजदेह पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. घटस्फोटानंतरच्या आयुष्याबद्दल सीमा अनेकदा मोकळेपणे बोलताना दिसली आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने डेटिंग, तरुण पुरुषांकडून मिळणारं अटेंशन आणि भविष्यातील नात्याबद्दल आपला दृष्टीकोन स्पष्ट केला आहे.

अभिनेता सोहैल खानची पूर्व पत्नी आणि फॅशन डिझायनर सीमा सजदेह पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. घटस्फोटानंतरच्या आयुष्याबद्दल सीमा अनेकदा मोकळेपणे बोलताना दिसली आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने डेटिंग, तरुण पुरुषांकडून मिळणारं अटेंशन आणि भविष्यातील नात्याबद्दल आपला दृष्टीकोन स्पष्ट केला आहे.

2 / 5

नेहा धूपिया आणि अंगद बेदी यांच्या 'डबल डेट' या युट्यूब शोमध्ये सीमाने तिच्या खासगी आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. तिला कमी वयाच्या पुरुषांकडून अटेंशन मिळतं का, असा थेट प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सीमाने कोणताही आडपडदा न ठेवता 'हो' असं उत्तर दिलं. मात्र तिला नात्यात पुन्हा 'आईची भूमिका' निभावण्यात रस नसल्याचं तिने स्पष्ट केलं.

3 / 5

सीमाच्या मते, आता तिच्यासाठी नातं म्हणजे कोणावर अवलंबून राहणं नाही. ती स्वत:च्या आयुष्यात आनंदी असून एकटेपणाची भीती तिला वाटत नाही. दिवसभराचा थकवा घेऊन घरी आल्यानंतर पाळीव श्वानासोबत वेळ घालवणं तिला आवडतं. त्यामुळे घरी दुसरी व्यक्ती असणं नेहमीच आवश्यक वाटत नाही, असंही तिने सांगितलं.

4 / 5

मात्र याचा अर्थ असा नाही की सीमाला आयुष्यात जोडीदारच नको आहे. तिने 'कंपॅनियनशिप'ची इच्छा असल्याचं मान्य केलं. तिच्या मते, भविष्यात असा साथीदार असावा ज्याच्यासोबत प्रवास करता येईल, चांगलं जेवण आणि आयुष्यातील सुंदर क्षण शेअर करता येतील. मात्र नातं हे गरज म्हणून नव्हे तर आनंदासाठी असावं, अशी तिची भूमिका आहे.

5 / 5

सीमाने सौंदर्यासाठी आणि अधिक तरुण दिसावं यासाठी केलेल्या उपचारांबाबतही खुलासा केला. तिने फिलर्स, बोटॉक्स, प्रोफिलो आणि लेझर ट्रीटमेंट घेतल्याचं सांगितलं आहे. सोहैल खान आणि सीमा यांनी 24 वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर 2022 मध्ये घटस्फोट घेतला. या दोघांना दोन मुलं आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us