सोलापूर: टोमॅटोच्या शेतात भरले कमरे इतके पाणी, शेतकऱ्याची आर्त हाक

सोलापूरात पाऊस कोसळल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतात कमरेइतके पाणी साचले आहे. त्यामुळे २ एकरावरील टोमॅटोच्या शेतात पाणीच पाणी भरल्याने युवा शेतकऱ्याचे टोमॅटोचे पिक संकटात आले आहे. शेतकऱ्याने मायबाप सरकारला आता विनवणी केली आहे की तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्नावर कधी बोलणार आहात ? शेतकऱ्यांना हमीभावाची सर्वाधिक गरज असल्याचे त्याने म्हटले आहे.

| Updated on: Aug 06, 2025 | 8:08 PM
1 / 7
शेतीचा व्यवसाय आतबट्ट्याचा झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा हतबल झालेला आहे.

2 / 7
सोलापूरात पावसाने मोहोळ बेगमपुरात शेतात साचलेल्या पाण्यात बसून युवा शेतकऱ्याने कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना आर्त हाक दिली आहे.

3 / 7
कालच्या मुसळधार पावसामुळे 2 एकरावरील टोमॅटो पिकाच्या बागेत पाणीच पाणी झाल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे.

4 / 7
 राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक केवळ एकमेकांवर टीका करतातर शेतकऱ्याचा प्रश्न कोणीही मांडत नाही अशी शेतकऱ्याची व्यथा आहे.

5 / 7
कोणी रम्मी खेळली, कोणी मारामारी केली, तर कोणाचा बारच आहे, यावरच नेते मंडळी बोलतात मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न त्यामुळे बाजूला पडल्याचे दिसत आहे.

6 / 7
 युवा शेतकरी  लखन माने (युवा शेतकरी, बेगमपूर, मोहोळ) याने म्हटलंय की  माझ्या शेतात  10 ते 12 लाखाचे टोमॅटो पीक पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे.

7 / 7
त्यामुळे सरकारला लखन माने या शेतकऱ्याने विनंती केली आहे की आम्हाला पंचनामा नको,नुकसान भरपाई नको तर आमच्या पिकाला हमीभाव द्यावा  अशी विनंती या शेतकऱ्याने केली आहे.