
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे काही दिवसांपूर्वीच लग्न बंधनात अडकले आहेत. विशेष म्हणजे लग्नानंतर खास पार्टीचे आयोजन झहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याकडून करण्यात आले.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे दोघे सतत एकमेकांसोबत खास वेळ घालताना दिसत आहेत. आता नुकताच सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे अली फजल आणि ऋचा चढ्ढा यांच्या घरी पोहोचले आहेत.

आता याचेच काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. एका फोटोमध्ये सर्वजण एकत्र बसून जेवताना दिसत आहेत. टेबलवर अनेक पदार्थ ठेवण्यात आल्याचे बघायला मिळतंय.

त्यानंतर सर्वजण बसून गप्पा मारताना देखील दिसत आहेत. ऋचा चढ्ढा हिने काही दिवसांपूर्वीच बाळाला जन्म दिला आहे. 16 जुलैला ऋचा चड्ढाने बाळाला जन्म दिलाय.

झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न झाल्यापासून सोनाक्षी सिन्हा ही सतत चर्चेत आहे. सोनाक्षीच्या लग्नाला तिच्या घरच्यांचा विरोध असल्याचेही सांगितले जाते.