
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हटके अंदाजात चाहत्यांशी कनेक्ट होत असते.

आता नुकतंच झी-टॉकीजच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण ?’ या निमित्त या दशकाची फेवरेट कोण ठरणार यासाठी नामांकन जाहीर करण्यात आली आहेत.

याच निमित्तानं सोनालीनं काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

या दशकातील तिचा पहिला चित्रपट म्हणजेच ‘नटरंग’. ज्या चित्रपटानं सोनालीला अप्सरा म्हणून ओळख दिली त्या चित्रपटाच्या काही आठवणी तिनं शेअर केल्या आहेत.

सोनालीनं शेअर केलेल्या या फोटोंना चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.