
फेब्रुवारी 2020मध्ये मराठमोळी अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरचा साखरपुडा पार पडला होता.

वाढदिवसाचं निमित्त साधत लॉकडाऊनच्या काळात सोनालीनं ही गुड न्यूज सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती.

तर आज सोनाली आणि कुणाल यांची पहिली इंगेजमेंट अॅनिव्हर्सरी आहे. या निमित्तानं सोनालीनं साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

‘साखरपुड्याच्या पलीकडे आणि लग्नाच्या अलीकडे’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

सोनालीने 2021 मध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं चाहत्यांशी शेअर केलं होतं. त्यामुळे अप्सरेच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहात असतील यात शंका नाही.

सोनाली कुलकर्णी या फोटोमध्ये कमाल दिसतेय.