
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी सोनाली आजही तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. पिवळ्या रंगाच्या साडीत अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहे.

फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये तुम्ही जिथे जाल तिथे... सूर्यप्रकाश सोबत घेऊन जा.... असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

'हम साथ साथ है', 'सरफरोश', 'दिलजले', 'कल हो ना हो' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये सोनालीने महत्त्वाची भूमिका साकारली. आता अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
