बांग्लादेशात जाऊन खेळणार 2 हिंदू क्रिकेटर, सत्तापालट, हिंसाचारानंतर पहिल्यांदा असं घडणार

2 मॅचची टेस्ट सीरीज 21 ऑक्टोबरपासून ढाका येथे सुरु होणार आहे. दुसरी टेस्ट मॅच 2 नोव्हेंबरपासून चट्टोग्राम येथे खेळली जाणार आहे.

| Updated on: Oct 01, 2024 | 2:57 PM
1 / 5
ऑगस्ट महिन्यात शेख हसीना सरकारचा तख्तापलट झाला. त्यानंतर बांग्लादेशमध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं जाणार आहे.

ऑगस्ट महिन्यात शेख हसीना सरकारचा तख्तापलट झाला. त्यानंतर बांग्लादेशमध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं जाणार आहे.

2 / 5

खास बाब म्हणजे 2 परदेशी हिंदू खेळाडू या सीरीजमध्ये खेळण्यासाठी बांग्लादेश दौऱ्यावर जाणार आहेत. अल्पसंख्यांक हिंदुंविरोधात मोठा हिंसाचार झाल्यानंतर हे खेळाडू बांग्लादेशात जाणार आहेत.

3 / 5

या दोन हिंदू खेळाडूंची नाव आहेत, केशव महाराज आणि सेनुरन मुथुसामी. दक्षिण आफ्रिकन टीमसोबत ते बांग्लादेश दौऱ्यावर जाणार आहेत.

4 / 5

बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये 21 ऑक्टोबरपासून टेस्ट सीरीज सुरु होणार आहे. त्यासाठी दक्षिण आफ्रिकन सरकार आणि बोर्डाकून मंजुरी घेण्यात आली आहे.

5 / 5

दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने या सीरीजसाठी आपल्या स्क्वॉडची घोषणा केली आहे. यात फिरकी गोलंदाजीवर भर आहे. केशव महाराज आणि सेनुरन मुथुसामी या टीमचा महत्त्वाचा भाग आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us