भारताला 17 वेळा जखमी करणाऱ्या, 59 वेळा एका डावात पाच विकेट घेणाऱ्या नंबर 1 बॉलरला ICC कडून मोठा सन्मान

टेस्ट मॅचमध्ये तब्बल 59 वेळा एका डावात पाच विकेट घेणारा, 14 वेळा 10 विकेट घेणार खेळाडू आयसीसीच्या मानाच्या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. भारताला तर त्याने नुकतच 17 वेळा जखमी केलं होतं.

| Updated on: Dec 15, 2025 | 3:56 PM
1 / 5
दक्षिण आफ्रिकेचा ऑफ स्पिनर सायमन हार्मरने भारताविरुद्ध दोन कसोटी सामन्यात कमालीचं प्रदर्शन केलं. त्याला आता मोठ बक्षीस मिळालं आहे. 36 वर्षाच्या या खेळाडूची नोव्हेंबर महिन्यातील बेस्ट आयसीसी प्लेयर म्हणून निवड झाली आहे. (PC-PTI)

2 / 5
सायमन हार्मरने भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या ऐतिहासिक कसोटी विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. त्याने दोन टेस्ट मॅचमध्ये मिळून एकूण 17 विकेट काढले होते. त्या बळावर दक्षिण आफ्रिकेने 2-0 ने टेस्ट सीरीज जिंकली.  (PC-PTI)

3 / 5
 सायमन हार्मरने ईडन गार्डन्सवर 8 विकेट आणि गुवाहाटी टेस्टमध्ये 9 विकेट काढले. हार्मर आपल्या पहिल्या भारत दौऱ्यात पूर्णपणे अपयशी ठरला होता. पण यावेळी तो पूर्ण तयारीनिशी आलेला. प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला. (PC-PTI)

4 / 5
सायमन हार्मर दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज फर्स्ट क्लास क्रिकेटरपैकी एक आहे. या ऑफ स्पिनरने 237 फर्स्ट क्लास सामन्यात 1020 विकेट घेतल्या आहेत. 59 वेळा त्याने एका डावात पाच विकेट घेण्याचा कारनामा केला आहे. 14 वेळा हार्मरने 10 विकेट घेतले आहेत.  (PC-PTI)

5 / 5
फक्त गोलंदाजीच नाही, तर सायमन हार्मर फलंदाजीतही मागे नाही. त्याच्या नावावर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 6558 धावा आणि दोन शतकं आहेत. 33 अर्धशतकं सुद्धा त्याने झळकवली आहेत. (PC-PTI)