
अभिनेत्री श्रृती हसन हीचा आज 36 वाढदिवस आहे. श्रृती ही ज्येष्ठ अभिनेते कमल हसन आणि सारिका ठाकूर यांची मुलगी. तिचे वडील तमिळ आहेत तर आई महाराष्ट्रीयन आहे. 'लक' हा तिचा पहिला सिनेमा. मात्र याआधी तिने तिच्या वडिलांच्या 'हे राम' या चित्रपटात छोटी भूमिका साकारली होती. तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं आहे.

'ओ माय फ्रेंड' या तेलगु सिनेमातील तिची भूमिकाही महत्वाची होती. '3' या तमिळ चित्रपटातही तिने काम केलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटात तिने महत्वाच्या भूमिका केल्या, ज्या प्रचंड गाजल्या.

'रमैय्या वस्तावैय्या' या हिंदी चित्रपटातील तिची भूमिका प्रचंड गाजली. या सिनेमातील तिच्या 'सोना' या पात्राने सर्वांचं मन जिंकून घेतलं. त्यामुळे बॉलीवूडमध्ये तिची वेगळी ओळख निर्माण झाली.

फार कमी लोकांना माहित आहे की श्रृती अभिनयाबरोबरच गाणंही गाते. तिचा आवाजही तितकाच सुमधूर आहे. तिने दक्षिणेकडच्या काही गाण्यांचं संगीत दिग्दर्शनही केलं आहे.

श्रृती तिच्या सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. तिचे इन्स्टाग्रामवर 18 मीलियनहून अधिक फॉलोव्हर्स आहेत.