घराबाहेर जाताना फ्रिजमध्ये आवर्जून ठेवा एक चमचा; आरोग्यासाठी ही ट्रिक अत्यंत महत्त्वाची

तुम्ही घर बंद करून बाहेर पडत असाल, तर फ्रिजमध्ये एक चमचा आवर्जून ठेवा. या एका छोट्याशा ट्रिकमुळे फ्रिजमधील अन्नपदार्थ खाण्यासाठी सुरक्षित आहेत की नाहीत, हे कळण्यास मदत होऊ शकते.

| Updated on: May 01, 2026 | 12:12 PM
1 / 6
घर बंद करताना किंवा प्रवासाला निघताना आपण घरातील दिवे, पंखे, गॅस आवर्जून बंद करतो आणि बंद केलेत का याची खात्री करतो. पण घरातील फ्रिजकडे मात्र फारसं लक्ष देत नाही. तुम्ही घरी नसताना वीज गेली तर फ्रिजमधील दूध, दही, भाज्या, पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. पण मग हे कसं ओळखायचं? तर यासाठी आम्ही एक स्मार्ट ट्रिक सांगणार आहोत. घराबाहेर पडण्यापूर्वी तुम्ही फ्रीजमध्ये एक चमचा ठेवल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अन्नपदार्थ सुरक्षित आहेत की नाही, ते तुम्हाला सहज जाणून घेता येईल.

2 / 6
यासाठी सर्वप्रथम घरातून निघण्यापूर्वी एक लहान वाटी घ्या आणि ती पाण्याने पूर्ण भरा. ती वाटी फ्रिजरमध्ये ठेवून त्यातील पूर्ण पाणी गोठून बर्फ होईपर्यंत थांबा. पाणी पूर्णपणे गोठल्यानंतर त्यावर एक चमचा आडवा ठेवा. फ्रिजरमध्ये बर्फाने गोठलेल्या कपावर चमचा आडवा ठेवून तुम्ही निश्चिंतपणे घराबाहेर जाऊ शकता. लक्षात ठेवा, हा चमचा बर्फाच्या पृष्ठभागावर आडवा असला पाहिजे, कारण तुम्ही घरात नसताना नेमकं काय घडलं, हे त्या चमच्याच्या स्थितीवरून समजेल.

3 / 6
तुम्ही घरी परत आल्यानंतर फ्रीजर उघडून सर्वांत आधी चमच्याची स्थिती तपासा. जर चमचा अजूनही तुम्ही जसं ठेवून गेलात, तसाच बर्फावर असेल तर याचा अर्थ तुम्ही घरी नसताना वीजपुरवठा खंडीत झाला नव्हता किंवा झाला असला तरी तो फार कमी वेळासाठी होता. म्हणूनच तो बर्फ वितळला नाही आणि तुमचं फ्रीजमधील अन्न खाण्यासाठी सुरक्षित आहे.

4 / 6
जर चमचा बर्फाच्या तुकड्याच्या मध्यभागी पडला, तर याचा अर्थ असा की तुम्ही घराबाहेर असताना बराच वेळ वीज गेली होती. त्यामुळेच बर्फ अंशत: वितळला आणि चमचा खाली घसरला. अशा परिस्थितीत फ्रिजमधील काही खाद्यपदार्थ खराब होण्याची किंवा बॅक्टेरिया वाढण्याची अधिक शक्यता असते.

5 / 6
जर चमचा कपाच्या पूर्ण तळाशी गेला असेल, तर याचा अर्थ असा होतो की बराच काळ वीजपुरवठा खंडीत होता आणि त्यामुळे फ्रिजमधील अन्नपदार्थ खाण्यायोग्य नाहीत. जरी ही गोष्ट क्षुल्लक वाटत असली तरी ती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

6 / 6
वीजपुरवठा खंडीत झाला असताना खाद्यपदार्थांमध्ये बॅक्टेरिया वाढतात. वीज पुन्हा आली आणि फ्रिजमधील पदार्थ पुन्हा गोठले तरी पदार्थांमधील विषारी घटक तसेच राहतात. ते नष्ट होत नाहीत. असे पदार्थ खाल्ल्यामुळे उलट्या, संसर्ग आणि अतिसारचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे चमच्याची ही छोटी ट्रिक तुमच्या कामी येऊ शकते. (टीप- वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून टीव्ही 9 मराठी त्याची पुष्टी करत नाही.)

Follow Us