
वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत टीम इंडिया नव्या जर्सीसह मैदानात उतरणार आहे. ही जर्सी पाहून क्रीडाप्रेमी चांगलेच संतापले आहेत. त्याला कारणही तसंच आहे.

पहिल्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंनी फोटोशूट केलं. ही जर्शी पाहून क्रीडाप्रेमींना एक गोष्ट खूपच खटकली. ते म्हणजे जर्सीच्या मधोमधे लाल रंगात ड्रीम 11 असं लिहिलं आहे. हा रंग पाहून संताप व्यक्त केला आहे.

नव्या जर्सीवरून 'इंडिया' हे नावही गायब आहे. पण हे ठरल्याप्रमाणे केलं आहे. द्विपक्षीय मालिकेत टीम इंडियाच्या कसोटी जर्सीच्या पुढे स्पॉन्सरचं नाव प्रिंट केलं जातं. तसेच आयसीसी स्पर्धेत देशाचं नाव लिहिलेलं असतं.

विराट कोहली, रोहित शर्मा, यशवी जयस्वाल, अजिंक्य रहाणे, शुभमन गिल यांनी नव्या जर्सीसह पोझ दिल्या. टेस्ट जर्सीमध्ये Adidas लोगो आणि ड्रीम 11 लिहिलेलं दिसत आहे.

टीम इंडियाचे खेळाडू वेस्ट इंडिज विरुद्ध मैदानात उतरण्यापूर्वी सराव शिबिरात उतरले. त्यात खेळाडू एका हाताने झेल घेण्याच्या कवायतीत गुंतलेला दिसले. कोहली, गिल, इशान किशन, रहाणे या खेळाडूंनी अनोख्या पद्धतीने सराव केला.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत वरिष्ठ खेळाडूंवर चांगलंच दडपण असणार आहे. कारण या कामगिरीवर पुढच्या मालिकेतील स्थान ठरणार आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या वरिष्ठ खेळाडूंवर लक्ष असेल.

भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, इशान किशन, श्रीकर भरत, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर.