AI तंत्रज्ञानामुळे अभिषेक शर्मा वैतागला, थेट दिल्ली हायकोर्टात घेतली धाव
टिम इंडियाचा स्टार ओपनर अभिषेक शर्मा टी20 क्रिकेटमध्ये आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. पण असं असताना मैदानाबाहेर मात्र आर्टिफिशियल इंटेलिजेंसमुळे वैतागला आहे. बनावट फोटो आणि व्हिडीओमुळे त्याला त्रास झाला आहे. यासाठी त्याने थेट दिल्ली हायकार्टात धाव घेतली आहे.

टिम इंडियाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा इंग्लंड दौऱ्यावर असून टी20 मालिका खेळत आहे. असं असताना त्याच्या वतीने एक खटला दिल्ली हायकोर्टात सुरू आहे. आपले अधिकार सुरक्षित करण्यासाठी त्याने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. (PC-GETTY IMAGES)

अभिषेक शर्माने हायकोर्टात याचिका दाखल करत मागणी केली की, त्याच्या संमतीशिवाय त्याचं नाव, फोटोचा वापर एआयशी निगडीत गोष्टीत करू नये. त्याचा फोटोंचा कसा गैरवापर होत आहे, याची लिंकही त्याने कोर्टात सादर केली. (PC-GETTY IMAGES)

अभिषेक शर्माने या याचिकेत नमूद केलं की, त्याचा चेहरा आणि नावाचा चुकीचा वापर करून एआयद्वारे बनावट कंटेंट तयार करू नये. या मुद्द्यावर दिल्ली हायकोर्टाने सांगितलं की, ऑनलाइन जगात वैयक्तिक अधिकार आणि मानहानीशी निगडीत बाबींमध्ये बराच गोंधळ आहे. (PC-GETTY IMAGES)

दिल्ली हायकोर्टाने या प्रकरणी काही आदेश दिलेले नाहीत. पण न्यायाधीश ज्योति सिंहने अभिषेक शर्माच्या वकिलाला स्क्रिनशॉट्स जमा करण्यास सांगितलं आहे. या प्रकरणी मेटाकडून वकील उपस्थित होते. (PC-GETTY IMAGES)

अभिषेक शर्मा इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या मालिकेत चांगली फलंदाजी करत आहे. दोन्ही सामन्यात त्याने चांगली फलंदाजी केली त्याने पहिल्या टी20 सामन्यात 59 आणि दुसऱ्या टी20 सामन्यात 43 धावा केल्या. (PC-GETTY IMAGES)