
क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री नताशा स्टेनकोविक या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. नताशा मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती मुळ सर्बियाची आहे. नताशा-हार्दिक 2020 साली विवाहबद्ध झाले होते. मात्र आता दोघे विभक्त होणार असल्याची चर्चा आहे.

नताशा लॅव्हिश लाईफस्टाईल जगते. नताशाची ज्वेलरी, कपडे आणि हँड बॅग या साऱ्या वस्तू फार महागड्या आहेत.

नताशाच्या एका हँड बॅगची किंमत ही अडीच लाख रुपये असल्याची चर्चा आहेत. तसेच नताशाच्या कलेक्शनमध्ये एकसेएक हँड बॅग आहेत.

नताशा नेलआर्टची शौकीन आहे. नताशा नखांवर अनेक डिझाईन करुन घेत असते. नेलआर्ट फार खार्चिक असतं.

नताशा आयफोन वापरते. नताशाकडे असलेल्या आयफोनची किंमत दीड लाख रुपये असल्याची माहिती आहे. नताशाची रिंगही फार महाग आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिकपेक्षा नताशाची नेटवर्थ जास्त आहे. नताशाचं नेटवर्थ 20 कोटी रुपयांच्या घरात आहे.