T20 World Cup: कर्णधार म्हणून एडन मार्करमच्या शिरपेचात मानाचा तुरा, रोहित शर्माला धोबीपछाड

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेची विजयी घोडदौड सुरू आहे. साखळी फेरीनंतर सुपर 8 फेरीतही विजयाने सुरुवात केली. सुपर 8 फेरीत भारताला पराभूत करत दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

| Updated on: Feb 23, 2026 | 4:09 PM
1 / 5
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील सामन्यात दक्षिण अफ्रिकेन भारताचा दारूण पराभव केला. दक्षिण अफ्रिकेने भारताला 76 धावांनी धोबीपछाड देत उपांत्य फेरीची वाट सोपी केली आहे. एडन मार्करमच्या नेतृत्वात दक्षिण अफ्रिकेने हा विजय मिळवला आहे. यासह एडन मार्कमर हा जगातील नंबर 1 कर्णधार ठरला आहे. त्याने रोहित शर्माला मागे टाकलं आहे.  (Photo- PTI)

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील सामन्यात दक्षिण अफ्रिकेन भारताचा दारूण पराभव केला. दक्षिण अफ्रिकेने भारताला 76 धावांनी धोबीपछाड देत उपांत्य फेरीची वाट सोपी केली आहे. एडन मार्करमच्या नेतृत्वात दक्षिण अफ्रिकेने हा विजय मिळवला आहे. यासह एडन मार्कमर हा जगातील नंबर 1 कर्णधार ठरला आहे. त्याने रोहित शर्माला मागे टाकलं आहे.  (Photo- PTI)

2 / 5

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत कर्णधार म्हणून एडन मार्करमची विजयी टक्केवारी अधिक आहे. एडन मार्करमने कर्णधार म्हणून 14 पैकी 13 सामन्यात विजय मिळवला आहे. त्याची विजयी टक्केवारी ही 92.9 टक्के आहे. तर रोहित शर्माने 14 पैकी 12 सामन्यात विजय मिळवला होता. त्याची विजयी टक्केवारी 85.7 टक्के आहे.  (Photo- PTI)

3 / 5

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार एरॉन फिंच या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 10 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. त्याची विजयी टक्केवारी 80 टक्के आहे. चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेचा कुमार संगकारा आहे. त्याने 14 पैकी 10 सामन्यात विजय मिळवला असून विजयी टक्केवारी 71.4 टक्के आहे.  (Photo- PTI)

4 / 5

दक्षिण अफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याची कर्णधार म्हणून विजयी टक्केवारी ही 68.8 टक्के आहे. त्याने 16 पैकी 11 सामन्यात विजय मिळवला आहे. म्हणजेच टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या टॉप 5 कर्णधारांमध्ये दक्षिण अफ्रिकेचे दोन कर्णधार आहेत.  (Photo- PTI)

5 / 5

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत एडन मार्करमच्या नेतृत्वात दक्षिण अफ्रिकेने अंतिम फेरी गाठली होती. पण अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. पण आता दक्षिण अफ्रिकेची कामगिरी पाहता जेतेपद मिळवू शकते अशी स्थिती आहे. त्यामुळे पुढे या स्पर्धेत काय होतं? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Photo- PTI)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us