
भारतीय संघाला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फक्त 3 वेळाच इंग्लंड विरुद्ध इंग्लंडमध्ये मालिका जिंकता आली आहे. तर आता रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर शुबमन गिल टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. त्यामुळे शुबमन गिल टीम इंडियाला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकून देणारा चौथा कर्णधार ठरणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे. (Photo Credit : PTI)

टीम इंडियाने 1971 साली पहिल्यांदा इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. भारतीय संघाने अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात इंग्लंडमध्ये पहिली सीरिज जिंकली होती. या 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिले 2 सामने बरोबरीत राहिले. तर टीम इंडियाने तिसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर केली. (Photo Credit :Icc X Account)

टीम इंडियाला 1971 नंतर सीरिज जिंकण्यासाठी 15 वर्षांची प्रतिक्षा करावी लागली. टीम इंडियाने कपिल देव यांच्या कॅप्टन्सीत 1986 साली 2-0 अशा फरकाने कसोटी मालिका जिंकली होती. (Photo Credit :Icc X Account)

त्यानंतर टीम इंडियाने तिसऱ्यांदा आणि अखेरीस 2007 साली इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली होती. टीम इंडियाने राहुल द्रविड यांच्या नेतृत्वात हा कारनामा केला होता. उभयसंघातील पहिला आणि तिसरा सामना अनिर्णित राहिला. तर दुसरा सामना टीम इंडियाने जिंकला होता. (Photo Credit :Icc X Account)

टीम इंडियाला तेव्हापासून गेली 18 वर्ष इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकता आली नाही. या 18 वर्षांमध्ये महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली या 2 यशस्वी कर्णधारांना भारताला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकून देता आली नाही. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

त्यामुळे आता शुबमन गिल कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत टीम इंडियाला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकून देणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष आहे. या 5 सामन्यांच्या मालिकेला 20 जूनपासून सुरुवात होत आहे. (Photo Credit : Bcci x Account)