
आशिया कप 2025 स्पर्धा यंदा टी 20 फॉर्मेटने होणार आहे. या निमित्ताने टीम इंडियासाठी टी 20I मध्ये सर्वात जास्त ओव्हर टाकणाऱ्या भारताच्या 5 गोलंदाजांबाबत जाणून घेऊयात. Photo Credit : Hardik Pandya X Account)

भारतासाठी टी 20I क्रिकेटमध्ये सर्वात जास्त ओव्हर टाकण्याचा विक्रम हा ऑलराउंडर हार्दिक पंड्या याच्या नावावर आहे. पंड्याने आतापर्यंत भारतासाठी 302.5 ओव्हर टाकल्या आहेत. (Photo Credit : Bcci X Account)

भुवनेश्वर कुमार या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. भूवनेश्वर कुमार याने 298.3 ओव्हर बॉलिंग केली आहे. मात्र दुर्देवाने भुवी गेल्या अनेक वर्षापासून टी20 आणि वनडे क्रिकेटपासून दूर आहे. (Photo Credit :PTI)

तिसऱ्या स्थानी फिरकीपटू युझवेंद्र चहल विराजमान आहे. चहलने टी 20I कारकीर्दीत 294 ओव्हर टाकल्या आहेत. भुवीप्रमाणे युझवेंद्र चहल हा देखील भारतीय संघात पुन्हा संधी मिळेल या प्रतिक्षेत आहे. (Photo Credit : RCB Website)

यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह चौथ्या क्रमांकावर आहे. जसप्रीत बुमराह याने भारताला आतापर्यंत अनेकदा एकहाती सामने जिंकून दिले आहेत. बुमराहने आतापर्यंत 251.3 ओव्हर टाकल्या आहेत. (Photo Credit : PTI)

भारताचा माजी ऑलराउंडर आर अश्विन पाचव्या स्थानी आहे. अश्विनने त्याच्या टी 20I कारकीर्दीत एकूण 242 ओव्हर बॉलिंग केली. (Photo Credit : PTI)