
आयसीसीने पुरुषांच्या टी20 इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर 2024 च्या विजेत्याची घोषणा केली आहे. या पुरस्कारासाठी चार खेळाडूंमध्ये स्पर्धा होती. या भारताचा अर्शदीप सिंग, पाकिस्तानचा बाबर आझम, ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा यांचा समावेश होता.

अर्शदीपने सिंगने तिघांना मागे टाकत पुरस्कार पटकावला आहे. अर्शदीप सिंगने मागच्या वर्षी टी20 फॉर्मेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. भारताला टी20 विश्वचषक विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

गेल्या वर्षी अर्शदीपने टीम इंडियासाठी 18 टी20 सामने खेळले आणि एकूण 36 विकेट घेतल्या. 2024 मध्ये तो टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला.

भारताला 17 वर्षांनंतर टी20 विश्वचषक जिंकून देण्यात अर्शदीप सिंगची महत्त्वाची भूमिका होती. त्याने सर्वाधिक विकेट घेतले होते. त्याने या स्पर्धेत एकूण 17 विकेट घेतल्या होत्या. अंतिम सामन्यातही अर्शदीप सिंगने 4 षटकात 20 धावा देत 2 महत्त्वाचे बळी घेतले होते. 19व्या षटकात फक्त 4 धावा दिल्या होत्या.

अर्शदीप सिंगचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण नोव्हेंबर 2022 मध्ये केले होते. त्याने अवघ्या 2 वर्षात टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रमही केला आहे. त्याने टीम इंडियासाठी टी20 मध्ये आतापर्यंत 98 विकेट घेतल्या आहेत. (सर्व फोटो- बीसीसीआय)