
डेविड वॉर्नर याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटची मालिका सुरु आहे. पाकिस्तान विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात नवा विक्रम रचला आहे. सलामीला येत डेविड वॉर्नरने विक्रम रचला आहे.

डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 90 धावांची भागीदारी केली. पण 38 धावांवर असताना वॉर्नर बाद होत तंबूत परतला.

डेविड वॉर्नर बाद झाला तरी त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला येत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला आहे. यापूर्वी हा विक्रम मॅथ्यू हेडनच्या नावावर होता.

ऑस्ट्रेलियाचा माजी डावखुरा फलंदाज मॅथ्यू हेडनने सलामीला येत एकूण 8625 धावा केल्या. आता हा विक्रम डेव्हिड वॉर्नरने मोडला आहे.

ऑस्ट्रेलियासाठी 202 कसोटी डाव खेळणाऱ्या डेविड वॉर्नरने सलामीवीर म्हणून एकूण 8659 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा सलामीचा फलंदाज होण्याचा मान मिळवला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम इंग्लंडच्या एलिस्टर कुकच्या नावावर आहे. इंग्लंडचा माजी कर्णधाराने सलामीवीर म्हणून एकूण 11845 धावा केल्या आहेत.