AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘World T20’ नाव बदलून ‘T20 World Cup’ कसं झालं? त्या मागचं लॉजिक काय? जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना त्याच्या इतिहासबाबत बरंच काही जाणून घेण्याचा क्रीडाप्रेमींचा प्रयत्न आहे. टी20 वर्ल्डकप नावाबाबतही असंच काहीसं आहे. त्याचं नाव आधी वर्ल्ड टी20 होतं. पण नंतर ते बदलण्यात आलं.

‘World T20’ नाव बदलून 'T20 World Cup' कसं झालं? त्या मागचं लॉजिक काय? जाणून घ्या
‘World T20’ नाव बदलून 'T20 World Cup' कसं झालं? त्या मागचं लॉजिक काय? जाणून घ्याImage Credit source: X Social Media and ICC
| Updated on: Feb 04, 2026 | 5:15 PM
Share

आयसीसीने टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 2007 पासून सुरुवात केली. या स्पर्धेचं पहिलं पर्व हे दक्षिण अफ्रिकेत पार पडलं आणि भारताने जेतेपदावर नाव कोरलं. पण या टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं नाव तेव्हा ‘वर्ल्ड टी-20’ असं होतं. काही पर्व याच नावासह गाजली. पण 2020 मध्ये या स्पर्धेचं नाव बदललं गेलं.  पुरूष आणि महिला या दोन्ही टी20 स्पर्धेच्या नावात आयसीसीकडून बदल करण्यात आला. पण नाव बदलून काय मिळालं? असा निर्णय घेण्याचं कारण काय? वगैरे अनेक प्रश्न तेव्हा उपस्थित केले गेले होते. काळाच्या ओघात नाव बदलल्याची चर्चाही संपली.  आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे त्याच्या नावाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. जर तुम्हाला या बदललेल्या नावामागचं लॉजिक माहिती नसेल, तर पुढे तुम्हाला त्याची माहिती मिळेल.

आयसीसीने या स्पर्धेचं नाव टी20 वर्ल्डकप स्पर्धा केल्यानंतर सांगितलं होतं की, नवं नाव जागतिक व्यासपीठावर स्पर्धेचं प्रोफाईल आणखी भक्कम करेल. जागतिक क्रिकेटच्या रणनितीनुसार हे नाव बदललं असल्याचं प्रशासकीय मंडळाने सांगितलं. टी20 क्रिकेटचं जागतिक पातळीवर महत्त्व वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला होता. आयसीसीने स्पष्ट करत सांगितलं होतं की, नावातील बदलामुळे स्ट्रक्चरल बदलही दिसून येतात. यात सदस्य संघांना टी20 सामन्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जा देणे आणि 100हून अधिक आयसीसी सदस्यांना प्रादेशिक पात्रता मार्ग सुरू करण्याचा हेतू होता. त्याचेच परिणाम आता दिसून येत आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी गेल्या काही वर्षात पात्रता फेरी सुरू झाली आहे. तसेच संघांची संख्या 20 वर पोहोचली आहे. सलग दुसऱ्या पर्वात 20 संघ खेळत आहेत. कदाचित पुढे जाऊन या संघांची संख्या वाढू शकते. आयसीसी टी20 स्पर्धेपुढे वर्ल्डकप हे नाव देऊन जागतिक वाढीसाठी व्यासपीठ दिलं आहे. त्यामुळे टी20 क्रिकेटचा जागतिक पातळीवर वेगाने प्रसार होईल. दुसरीकडे, वनडे म्हणजे 50 षटकांच्या क्रिकेटचं नाव आधीच वनडे वर्ल्डकप ठेवलं आहे. तसेच नुकतीच सुरू झालेल्या कसोटी स्पर्धेचं नाव वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ठेवलं आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...