AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेपोलियन, राखी गुलजार ते चाचा चौधरींच्या प्राणपर्यंत; 15 ऑगस्टला या दिग्गजांचा वाढदिवस

15 ऑगस्ट हा भारताच्या स्वातंत्र्यदिनासोबतच अनेक महान व्यक्तींच्या जन्मदिनामुळेही खास आहे. नेपोलियन, अभिनेत्री राखी, कार्टूनिस्ट प्राण कुमार शर्मा, उस्ताद अमीर खान, वेटलिफ्टर गुरुराजा पुजारी यांसारख्या दिग्गजांचा जन्म याच दिवशी झाला. साहित्य, कला, राजकारण, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत त्यांनी मोठे योगदान दिले आहे, ज्यामुळे हा दिवस अधिक महत्त्वाचा ठरतो.

नेपोलियन, राखी गुलजार ते चाचा चौधरींच्या प्राणपर्यंत; 15 ऑगस्टला या  दिग्गजांचा वाढदिवस
15 ऑगस्टला या दिग्गजांचाही असतो वाढदिवस
| Updated on: Aug 15, 2026 | 10:50 AM
Share

15 ऑगस्ट हा दिवस भारतासाठी अत्यंत खास आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याबरोबरच हा दिवस अनेक कर्तृत्ववान व्यक्तींच्या जन्मदिनामुळेही महत्त्वाचा ठरतो. साहित्य, राजकारण, संगीत, चित्रपट, क्रीडा आणि कला अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अनेक महान व्यक्तींचा जन्म 15 ऑगस्ट रोजी झाला आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्री राखी, जगप्रसिद्ध फ्रेंच सम्राट आणि लष्करी रणनीतीकार नेपोलियन बोनापार्ट यांचा, तसेच कार्टूनिस्ट प्राण कुमार शर्मा जन्म याच दिवशी झाला होता. आजच्या दिवशी कोणाचा असतो वाढदिवस, जाणून घेऊया सविस्तर

नेपोलियन बोनापार्ट (1769) – फ्रान्सचा महान लष्करी नेता आणि राजकीय शासक म्हणून नेपोलियन बोनापार्ट यांची ओळख आहे. त्यांनी फ्रान्सचे सम्राटपद भूषवून युरोपच्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकला. त्यांच्या लष्करी रणनीतींचा आजही जगभर अभ्यास केला जातो. ‘नेपोलियन कोड’च्या माध्यमातून त्यांनी कायदेव्यवस्थेत महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्या. 1815 साली वॉटरलूच्या पराभवानंतर त्यांच्या साम्राज्याचा अस्त झाला.

राखी गुलजार (1947) – हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणजे राखी. 1970 आणि 80 च्या दशकात त्यांनी अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या. ‘शर्मीली’, ‘कभी कभी’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं. भावनिक तसेच दमदार भूमिका साकारण्याची त्यांची क्षमता ही त्यांच्या अभिनयाची खासियत होती.

प्राण कुमार शर्मा (1938) – ‘प्राण’ या नावाने प्रसिद्ध असलेले प्राण कुमार शर्मा हे भारतीय कॉमिक्स विश्वातील अत्यंत लोकप्रिय कार्टूनिस्ट होते. ‘चाचा चौधरी’ हे अजरामर पात्र त्यांनीच निर्माण केलं. चाचा चौधरीसोबतच ‘साबू’ हे पात्रही मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालं. त्यांच्या विनोदी आणि मनोरंजक कथांनी अनेक पिढ्यांचे बालपण समृद्ध केले. भारतीय कॉमिक्सच्या विकासात त्यांचे योगदान विशेष महत्त्वाचे आहे.

उस्ताद अमीर खान (1912) – उस्ताद अमीर खान हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील दिग्गज गायक होते. इंदूर घराण्याच्या विकासात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होतं. ख्याल गायकीतील त्यांची सखोलता, शांतता आणि भावपूर्ण मांडणी विशेष प्रसिद्ध होती. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला नवी उंची मिळवून दिली. त्यांच्या गायकीचा प्रभाव पुढील अनेक पिढ्यांवर दिसून येतो.

गुरुराजा पुजारी (1992) – भारताचे प्रसिद्ध वेटलिफ्टर असलेले गुरूराजा पुजारी यांचा जन्मही 15 ऑगस्ट रोजीच झाला. 2018 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक जिंकून भारताचं नाव उंचावलं. त्यांच्या या कामगिरीमुळे भारतीय वेटलिफ्टिंगला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक ओळख मिळाली. मेहनत आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा दिली आहे.

बिजन कुमार मुखर्जी (1891) – बिजन कुमार मुखर्जी हे भारताचे चौथे सरन्यायाधीश होते. न्यायव्यवस्थेतील विद्वत्ता, अनुभव आणि निष्पक्षतेसाठी त्यांची विशेष ओळख होती. सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय दिले. भारतीय न्यायव्यवस्थेच्या विकासातील त्यांच्या योगदानाची आजही आदराने नोंद घेतली जाते.

इन्दीवर (1924) – इन्दीवर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गीतकार होते. अनेक दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी असंख्य संस्मरणीय गाणी लिहिली. साध्या, सहज आणि भावपूर्ण शब्दांतून भावना व्यक्त करण्याची त्यांची खास शैली होती. त्यांच्या अनेक गीतांनी हिंदी चित्रपटसंगीताला वेगळी ओळख मिळवून दिली.

गोपाल चतुर्वेदी (1942) – गोपाल चतुर्वेदी हे हिंदीतील प्रसिद्ध व्यंग्यकार. त्यांनी लेखनातून समाजातील विसंगती, राजकीय आणि सामाजिक वास्तव यांवर मार्मिक भाष्य केलंते. त्यांच्या विनोदी आणि उपरोधिक शैलीला वाचकांची मोठी पसंती मिळाली. हिंदी व्यंग्य साहित्य समृद्ध करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

Follow Us
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल