
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा टेस्ट रॅकिंगमध्येही बोलबाला पाहायला मिळतोय. आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचे 3 फलंदाज टॉप 3 मध्ये आहेत. ऑस्ट्रेलियाच्या 3 फलंदाजांनी 39 वर्षांनंतर पहिल्यांदा अशी कामगिरी केलीय. (PC-PTI)

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये मार्नस लाबुशेन पहिल्या क्रमांकावर आहे. तर स्टीव्हन स्मिथ दुसऱ्या स्थानी आहे. (PC-PTI)

तर टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरलेल्या ट्रेव्हिस हेड हा तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. ट्रेव्हिस आधी पाचव्या क्रमांकावर होता. (PC-AFP)

विंडिजच्या गॉर्डन ग्रीनीज, क्लाईव लॉयड आणि लॅरी गोम्स या तिकडीने1984 साली टॉप 3 मध्ये स्थान पटकावलं होतं. (PC-PTI)

ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा हा टॉप 10 मध्ये आहे. उस्मान नवव्या स्थानी आहे. तर टीम इंडियाचा ऋषभ पंत 10,रोहित 12 आणि विराट 13 व्या स्थानी आहे. (PC-PTI)