
ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटून नाथन लियोनने एकही नो बॉल न टाकता कसोटी क्रिकेटमध्ये एका नव्या विक्रमाला गवसणी घातली ठआहे. त्याने 34504 चेंडू टाकले. पण यात एकही नो बॉल नव्हता. 34500हून अधिक चेंडू टाकत त्याने विक्रम रचला आहे. (Photo-AFP)

नाथन लियोनने 2011 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिका खेळत कारकिर्दीला सुरुवात केली होती. नाथन लियोनने आतापर्यंत 5750 षटकं टाकली आहेत. यात एकही नो बॉल टाकला नही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 100 सामने खेळून एकही नो बॉल न टाकलेला एकमेव गोलंदाज ठरला आहे. (Photo-AFP)

नाथन लियोन 139 कसोटी सामन्यात 34504 चेंडू टाकले आणि 16942 धावा दिल्या. तसेच 562 विकेट घेतल्या आहेत. यासह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सातवा गोलंदाज ठरला आहे. (Photo-AFP)

शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 708 विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर नाथन लियोन हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 5000हून अधिक षटके टाकली आणि एकही नो बॉल टाकला नाही. (Photo-AFP)

नाथन लियोन सध्या 27 वर्षांचा असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची अंतिम सामना खेळण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. म्हणजे आणखी दोन वर्षे क्रिकेट खेळेल. यामुळे त्याच्या विकेटची संघ्या 600च्या आसपास जाईल यात काही शंका नाही. (Photo-AFP)