
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाने काही प्रयोग केले. यानंतर टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी सलामीची जोडी निश्चित करण्यात आली आहे. पुढील वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघ डावखुरा आणि उजव्या जोडीसह मैदानात उतरेल.

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून सलामीला डावखुरा डेव्हिड वॉर्नर आणि ट्रेव्हिस हेड उतरला होता. आता डेव्हिड वॉर्नरने टी20 क्रिकेटला रामराम ठोकला आहे. त्यामुळे आगामी वर्ल्डकप स्पर्धेत डावाची सुरुवात कोण करणार? असा प्रश्न होता. मिचेल मार्चने याचं उत्तर दिलं आहे.

मिचेल मार्श म्हणालाी की, आगामी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत मी आणि ट्रेव्हिस हेड डावाची सुरुवात करू. यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत ग्लेन मॅक्सवेलचा सलामीवीर म्हणून प्रयोग केला होता. तसेच जेक फ्रेझर मॅकगर्क यालाही संधी दिली होती. पण त्यात फार काही यश आलं नाही.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आगामी टी20 विश्वचषकात अनुभवी फलंदाज मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांना सलामीवीर म्हणून मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्ससाठी मिचेल मार्श सलामीवीर म्हणून उतरला होता. त्याने 13 सामन्यांमध्ये 627 धावा केल्या होत्या.

10 ऑगस्टपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड डावाची सुरुवात करतील. यासह, ऑस्ट्रेलियन संघ भारत-श्रीलंका येथे होणाऱ्या पुढील टी20 विश्वचषकासाठी मोठी तयारी करण्यास सज्ज झाला आहे. (सर्व फोटो- टीव्ही कन्नडवरून)