चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीपूर्वीच ऑस्ट्रेलियाला धक्का, झालं असं की…

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारत, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ निश्चित झाले आहेत. तर दक्षिण अफ्रिका चौथा संघ ठरू शकतो. कारण नेट रनरेटचा आधार पकडला तर अफगाणिस्तानचं गणित सुटणं कठीण आहे. त्यामुळे उपांत्य फेरीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला धक्का बसला आहे.

| Updated on: Mar 01, 2025 | 4:30 PM
1 / 5
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारत आणि न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलियाने धडक मारली आहे. इंग्लंडविरुद्धचा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्यानंतर तसा हा मार्ग सुकर झाला होता. पण दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. पण मिळालेल्या प्रत्येक 1 गुणामुळे गणित सोपं झालं.

2 / 5
ब गटात ऑस्ट्रेलिया 4 गुणांसह टॉपला आहे. तसेच उपांत्य फेरीचं गणित सुटलं आहे. पण उपांत्य फेरीचा सामना खेळण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं आहे. कारण आघाडीचा फलंदाज मॅथ्यू शॉर्ट दुखापतग्रस्त झाला आहे.

3 / 5
लाहोरमध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना मॅथ्यू शॉर्टला दुखापत झाल्याचे माहिती आहे.  त्यामुळे उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत शंका आहे. जर शॉर्ट या महत्त्वाच्या सामन्यासाठी अनुपलब्ध राहिला तर ऑस्ट्रेलियासाठी तो मोठा धक्का असेल.

4 / 5
दुखापतीमुळे पॅट कमिन्स, मिचेल मार्श, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि मार्कस स्टोइनिस यांना आधीच माघार घ्यावी आहे. आता मॅथ्यू शॉर्ट उपांत्य फेरीसाठी उपलब्ध नसेल, तर त्याच्या जागी जेक प्रेसर मॅकगर्क मैदानात उतरवण्याशिवाय पर्याय उरणार नाही.

5 / 5
ऑस्ट्रेलिया संघ: स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), जेक फ्रेझर-मॅकगर्क, आरोन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघ, अॅडम झांपा, शॉन अ‍ॅबॉट, अॅलेक्स केरी, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, मॅथ्यू शॉर्ट (दुखापतग्रस्त).