PSL : 10 वर्षांत 3 वेळा चॅम्पियन, बाबर आझमचा दबदबा कायम, पीएसएल स्पर्धेत असा कारनामा

Babar Azam Psl Final Stats: बाबर आझम याने पाकिस्तानमधील पीएसएल अर्थात पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत आपला दबदबा कायम राखला आहे. बाबर आझम प्रतिनिनधित्व करत असलेल्या संघाता अंतिम सामन्यात कधीच पराभव झालेला नाही.

Sanjay patil | Updated on: May 04, 2026 | 4:50 PM
1 / 5
पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज याने पीएसएल अर्थात पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीतील आपला दबदबा कायम ठेवला आहे. बाबरची टीम जेव्हा जेव्हा अंतिम फेरीत पोहचलीय तेव्हा तेव्हा विजयी झालीय. (Photo Credit: PSL)

पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज याने पीएसएल अर्थात पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीतील आपला दबदबा कायम ठेवला आहे. बाबरची टीम जेव्हा जेव्हा अंतिम फेरीत पोहचलीय तेव्हा तेव्हा विजयी झालीय. (Photo Credit: PSL)

2 / 5

बाबरने त्याच्या नेतृत्वात पेशावर झाल्मी टीमला चॅम्पियन केलं. बाबरची यंदाची पीएसएल फायनलमध्ये खेळण्याची तिसरी वेळ होती. याआधी 2 वेळा बाबर खेळाडू म्हणून अंतिम फेरीत विजयी ठरला होता. तर यंदा बाबरने कर्णधार म्हणून आपल्या नेतृत्वात टीमला चॅम्पियन केलं. (Photo Credit: Getty)

3 / 5

बाबर पीएसएल स्पर्धेत पहिल्यांदा 2016 साली अंतिम फेरीत पोहचला होता. तेव्हा बाबर इस्लामाबाद यूनायटेडचं प्रतिनिधित्व करत होता. इस्लामाबाद युनायडेटने तेव्हा चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला होता. (Photo Credit : Getty)

4 / 5

त्यानंतर 2020 साली कराची किंग्स पीएसएलच्या अंतिम फेरीत पोहचली होती. तेव्हा बाबर आझम चॅम्पियन टीमचा सदस्य होता. (Photo Credit : Getty)

5 / 5

पीएसएल स्पर्धेला 2016 पासून सुरुवात झाली होती. तेव्हापासून गेल्या 10 वर्षांत या स्पर्धेत 11 हंगामांचं यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलंय. या 11 पैकी तिन्ही वेळा बाबर आझम चॅम्पियन ठरला आहे. (Photo Credit: Getty)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us