
बाबर आझम चांगल्या फॉर्मसाठी गेल्या काही दिवसांपासून झुंज देत आहे. पण यात त्याला काही यश येताना दिसत नाही. बिग बॅश लीगच्या क्वॉलिफायर सामन्यातही त्याची बॅट काही चालली नाही. बाबर आझम पर्थ स्कॉर्चर्सविरुद्ध खातंही खोलू शकला नाही. (फोटो-Janelle St Pierre - CA/Cricket Australia via Getty Images)

बाबर आझम फलंदाजीला आला आणि दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. फिरकीपटू कूपर कॉनलीच्या गोलंदाजीवर स्टम्पिंग झाला. कॉनलीच्या चेंडूवर जोरदार फटका मारण्याच्या नादात क्रिजमधून पुढे आला आणि विकेट दिली. (Photo: Sydney Sixers X)

बिग बॅश लीग स्पर्धेत बाबर आझम आतापर्यंत 11 सामने खेळला. यात 7 सामन्यात त्याला दुहेरी आकडाही गाठता आला नही. दोन अर्धशतकं ठोकली. पण दोन्ही डावात 58 धावा केल्या. त्याने या स्पर्धेत 22.4 च्या सरासरीने 202 धावा केल्यात. (Photo: Sydney Sixers X)

बाबर आझमचं फलंदाजीचं तंत्र ऑस्ट्रेलियात पूर्णपणे फेल गेलं आहे. वेग आणि उसळी घेण्याऱ्या चेंडूंचा सामना करणं त्याला कठीण गेल्याचं दिसत आहे. दुसरीकडे, फिरकीचा सामना करण्यात अडचण आली. इतकंच काय तर आक्रमक खेळच बाबर विसरल्याचं दिसून आलं.(Photo: Sydney Sixers X)

बाबर आझमचा फॉर्म पाहता पाकिस्तानच्या टी20 संघात निवड होणं कठीण दिसत आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी पाकिस्तानने अजूनही संघ जाहीर केलेला नाही. या संघात बाबर आझमचं नाव नसल्यास आश्चर्य वाटायला नको. (Photo: Sydney Sixers X)